मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Bypoll : कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूक जाहीर; फेब्रुवारीत 'या' तारखेला मतदान

Pune Bypoll : कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूक जाहीर; फेब्रुवारीत 'या' तारखेला मतदान

Jan 18, 2023, 04:50 PM IST

  • Chinchwad and Kasba Peth Bypoll : पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळं आता भाजप आणि राष्ट्रवादी पुण्यात आमनेसामने येणार आहे.

Chinchwad And Kasba Peth Bypoll (HT)

Chinchwad and Kasba Peth Bypoll : पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळं आता भाजप आणि राष्ट्रवादी पुण्यात आमनेसामने येणार आहे.

  • Chinchwad and Kasba Peth Bypoll : पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळं आता भाजप आणि राष्ट्रवादी पुण्यात आमनेसामने येणार आहे.

Chinchwad And Kasba Peth Bypoll : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर आता पुण्यातील कसबा पेठसह चिंचवड विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगानं पोटनिवडणूक जाहीर केली आहे. येत्या २७ फ्रेब्रुवारीला दोन्ही मतदारसंघात निवडणूक होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. त्यामुळं आता पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. येत्या ३१ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून ०७ फेब्रुवारीला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर १० फेब्रुवारीला अर्ज परत घेण्याचा अखेरचा दिवस असून २७ फेब्रुवारीला दोन्ही मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्यानंतर ०२ मार्चला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

कसबा पेठमधील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमधील भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं होतं. त्यानंतर आता या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक होणार असल्यामुळं राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळं निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता फारच कमी आहे. याशिवाय राष्ट्रवादीनंही निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी केली आहे. त्यामुळं आता विधानसभेच्या निवडणुकीआधीच पुण्यात राजकीय धुराळा उडणार आहे.

कोणत्या पक्षाकडून कोणते नेते इच्छुक?

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपकडून हेमंत रासने, गणेश बीडकर आणि मुरलीधर मोहोळ यांचं नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना उमेदवारी देण्याची मागणी केली जात आहे. याशिवाय राष्ट्रवादीकडून रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह प्रशांत जगताप यांच्या नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर चिंचवड विधानसभा मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांनाच भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे पुन्हा रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहे.

पुढील बातम्या