मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  mumbai-pune express way: पोलिसांच्या आवाहनानंतरही मोठ्या प्रमाणात वाहनांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी

mumbai-pune express way: पोलिसांच्या आवाहनानंतरही मोठ्या प्रमाणात वाहनांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी

Dec 23, 2023, 04:38 PM IST

    • Mumbai Pune express way traffic jam : सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने लोणावळा येथे मुंबईहून अनेक पर्यटक आले आहे. तर पुण्याहून देखील अनेक पर्यटक कोकणात गेल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जॅम झाले आहे.
Mumbai Pune express highway traffic news

Mumbai Pune express way traffic jam : सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने लोणावळा येथे मुंबईहून अनेक पर्यटक आले आहे. तर पुण्याहून देखील अनेक पर्यटक कोकणात गेल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जॅम झाले आहे.

    • Mumbai Pune express way traffic jam : सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने लोणावळा येथे मुंबईहून अनेक पर्यटक आले आहे. तर पुण्याहून देखील अनेक पर्यटक कोकणात गेल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जॅम झाले आहे.

Mumbai Pune express highway traffic news : नाताळ सन आणि विकेंडमुळे सलग तीन दिवस शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यंटक लोणावळा आणि कोकणात गेल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर सकाळ पासून वाहनांच्या रांगा लागल्या आहे. तब्बल दोन ते तीन किमी पर्यंतच्या रांगा महामार्गावर लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. आज सकाळपासून पुणे सातारा मार्गावरील खंबाटकी घाटात देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Traffic news : सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर कोंडीची शक्यता; अवजड वाहनांनी 'ही' वेळ टाळावी!

आज पासून पुढील तीन दिवस सलग सुट्ट्या आल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडीची शक्यता पोलिसांना होती. त्यामुळे सकाळ पासून दुपारी १२ दरम्यान, अवजड वाहनांनी या वेळेत महामार्गावरून जाणे टाळावे. तसेच १२ नंतर या मार्गावरून प्रवास करावा असे आवाहन केले होते. मात्र, अनेक वाहनचालकांनी या कडे दुर्लक्ष केले तर काहींना पोलिसांच्या या आवाहन माहिती नसल्याने सकाळपासून ही वाहने त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यास निघाले होते.

Pune Police attack : पुण्यात निवृत्त पोलीस निरीक्षकावर जीवघेणा हल्ला; दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

मात्र, पर्यटनासाठी लोणावळा येथे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. तर अलिबाग तसेच रायगड मधील काही समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी देखील पुण्यातील नागरीक याच महामार्गाने सकाळी बाहेर पडल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. बोरघात, खोपोली या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

तब्बल दोन ते तीन किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांना त्यांच्या इच्छित ठिकाणी जण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, पोलिसांनी येथील वाहतूक सुरुळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर असल्याने ही कोंडीसोडवतांना ते देखील हतबल झाले. दरम्यान, उद्या आणि परवा सकाळी १० ते १२ दरम्यान, अवजड वाहनांनी या मार्गाने येथे टाळावे असे आवाहंन आज पुन्हा वाहतूक पोलिसांनी केले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या