मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime news : मीठ विक्रीच्या आडून ड्रग्सची तस्करी, पुण्यात १०० कोटींपेक्षा अधिकचे ड्रग्स जप्त; मोठे रॅकेट उद्ध्वस्त

Pune Crime news : मीठ विक्रीच्या आडून ड्रग्सची तस्करी, पुण्यात १०० कोटींपेक्षा अधिकचे ड्रग्स जप्त; मोठे रॅकेट उद्ध्वस्त

Feb 20, 2024, 08:21 AM IST

    • Pune Crime News : पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १०० कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे. या सोबतच मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेटसुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले आहे. ही कारवाई विश्रांतवाडी येथे करण्यात आली.
Pune Crime News

Pune Crime News : पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १०० कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे. या सोबतच मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेटसुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले आहे. ही कारवाई विश्रांतवाडी येथे करण्यात आली.

    • Pune Crime News : पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १०० कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे. या सोबतच मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेटसुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले आहे. ही कारवाई विश्रांतवाडी येथे करण्यात आली.

Pune Crime News : पुणे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल १०० कोटीहून अधिक रक्कमेचे ड्रग्स जप्त केले आहे. ड्रग्स तस्कर मिठाच्या आडून ही विक्री करत होते. विश्रांतवाडी येथे करण्यात आलेल्या कारवाईत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल ५२ किलो पेक्षा आधिक मेफेड्रॉन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो एमडीची किंमत २ कोटी रुपये आहे.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी महत्वाचा दिवस, आज विधानसभेचे आज विशेष अधिवेशन

या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (रा. पुणे), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५, रा. पुणे) आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सापडू नये म्हणून हे आरोपी मिठाच्या पॅकमध्ये या पावडरची विक्री करत होते.

Maharashtra weather update : राज्यात तापमानात होतेय वाढ! थंडीचा प्रभाव कमी; राज्यात असे असेल हवामान

या कारवाई संदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने शहरातील विश्रांतवाडी भागात छापा टाकला. या संदर्भात गुप्त बतमीदारांकडून गुन्हे शाखेतील युनिट १ च्या पथकाला सोमवार पेठेत एक चारचाकीमध्ये सराईत गुन्हेगार वैभव हा एमडी ड्रगची डिलिव्हरी देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या बाबत सापळा रचला. आरोपी येताच दबा धरून बसून असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे १ कोटी रुपयांचे ५०० ग्रॅम एमडी आढळून आले. पोलिसांनी दोघांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी एमडी देणाऱ्या हैदर शेखची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी हैदर शेखला अटक करत त्याच्या कडून देखील एक कोटीचे ५०० ग्रॅम एमडी जप्त केले. त्याला अटक करून त्याची चौकशी केली असता. त्याने त्याच्या मिठाच्या गोदामात तब्बल ५२ किलो एमडी लपवले असल्याचे आढळले.

पुण्यात ड्रग्स तस्कर ललित पाटील याला अटक केल्यावर करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे. या कारवाईत मोठी आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणारी टोळी उद्ध्वस्त झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मोठ्या प्रमाणात पुण्यात मिळणाऱ्या ड्रग्समुळे पुण्यातील तरुणाई चालली कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये ड्रग्ज तस्कर ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांकडून ससून रुग्णालयाच्या परिसरात सव्वादोन कोटी रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले होते.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या