Maharashtra Weather update : राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. राज्यभरात हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे. रविवारी अकोल्यात सर्वाधिक ३६.८ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच्या चारही विभागात हवामान कोरडे राहील. पुढील ७२ तासात आकाश वेळोवेळी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. २१ फेब्रुवारी नंतर हळू हळू आकाश निरभ्र होऊ लागेल. किमान तापमानात तापमानात आज आणि उद्या किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पश्चिमी विक्षोभ ६५ डिग्री पूर्व अक्षांश व ३० डिग्री उत्तर रेखांशावर द्रोणिका रेषेच्या स्वरूपात आहे. दूसरा पश्चिमी विक्षोभ हा उत्तर पाकिस्तानवर आहे. या पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावाने तयार झालेली एक चक्रीय स्थिती मध्य पाकिस्तानवर आहे. उत्तर भारतावरील जेट स्ट्रीम विंडचा प्रभाव वाढला आहे. या आधारे महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज असा आहे, राज्याच्या चारही विभागात हवामान कोरडे राहील. पुढील ७२ तासात आकाश वेळोवेळी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. २१ फेब्रुवारी नंतर हळू हळू आकाश निरभ्र होऊ लागेल. किमान तापमानात तापमानात आज आणि उद्या किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
पुण्यात आणि परिसरात पुढील ४८ तास आकाश वेळोवेळी अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. २१ फेब्रुवारी नंतर २४ तारखेपर्यंत आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. आज आणि उद्या किमान तापमानात किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे. २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान किमान तापमानात अंदाजे ३ डिग्रीने घट होण्याची तर कमाल अंदाजे २ डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे.
देशात उत्तर भागात पावसाचा इशारा
उत्तर भारताच्या वरील भागात एक तेज जेट स्ट्रीम तयार झाले आहे. या सर्वांमुळे जम्मू-काश्मीर, उत्तराखंड हिमाचल प्रदेश सोबत पूर्ण उत्तर भारतात पुढील काही दिवस मध्यम ते तुरळ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे दोन महामार्ग बंद करण्यात आले आहे. यामुळे या राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात तापमानात होतेय वाढ
महाराष्ट्रातील तापमाना सध्या वाढ होऊ लागली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, जळगाव, अकोला, वर्धा या सारख्या शहरात दिवसा प्रखर उन असल्याने कमाल आणि किमान तापमानात वाढ वाढ झाल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी पारा हा ३५ डिग्री सेल्सिअसच्या वर पोहचला आहे. तर काही ठिकाणी ३७ डिग्री सेल्सिअस पर्यंत पारा गेला आहे. काही भागात कडक ऊन असेल. तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील २६ तारखेनंतर काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या