मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Politics : शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर; ठाकरेंचं कौतुक करत संजय शिरसाटांचे शिवसेनेत परतण्याचे संकेत

Politics : शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर; ठाकरेंचं कौतुक करत संजय शिरसाटांचे शिवसेनेत परतण्याचे संकेत

Aug 13, 2022, 08:55 AM IST

    • Eknath Shinde Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेट विस्तारानंतर आता शिंदे गटातील आमदारांची नाराजी चव्हाट्यावर येत आहे.
Sanjay Shirsath On Uddhav Thackeray (HT)

Eknath Shinde Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेट विस्तारानंतर आता शिंदे गटातील आमदारांची नाराजी चव्हाट्यावर येत आहे.

    • Eknath Shinde Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेट विस्तारानंतर आता शिंदे गटातील आमदारांची नाराजी चव्हाट्यावर येत आहे.

Sanjay Shirsath On Uddhav Thackeray : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यानं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट नाराज असून आता त्यांनी थेट उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. त्यामुळं आता शिरसाट हे शिवसेनेत परतण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. कारण आता आमदार शिरसाटांनी एक ट्विट केलं होतं, त्यात ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा करण्यात आला होता. याशिवाय त्यांच्या विधानसभेतलं एक भाषणही त्यांनी शेयर केलं होतं. परंतु काही वेळातच त्यांनी ते ट्विट डिलीट केलं, त्यामुळं आता मंत्रिपद मिळालं नाही तर पुन्हा शिवसेनेत जाणार, असा इशाराच शिरसाटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्याची चर्चा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

<p><strong>Sanjay Shirsath On Uddhav Thackeray</strong></p>

ठाकरेंचं कौतुक करणारं ट्विट केल्यानंतर शिंदे गटाचे आमदार शिरसाट म्हणाले की, आम्ही आजही शिवसेनाच आहोत, आमचा नेता हा आमचा कुटुंबप्रमुख असतो, उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत, आमची त्यांच्यावर नाराजी असली तरी आम्ही त्यांच्याविरोधात बोलू शकत नाही. त्यांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नव्हती, परंतु ते आजही आमचे कुटुंबप्रमुखच असल्याचं शिरसाट माध्यमांशी बोलताना म्हणाले.

मंत्रिपद न मिळाल्याच्या मुद्द्यावर बोलताना शिरसाट म्हणाले की, मी एखाद्यावर विश्वास ठेवला तर मान कापली गेली तरी हरकत नाही, मंत्रिपदासाठी मी भूकेला नाही. परंतु ज्या ठिकाणी चुकतं त्या ठिकाणी बोलायला हवं, मी स्पष्टपणे बोलतो, मला मंत्रिपद मिळालं किंवा नाही मिळालं, हा विचार कधीच डोक्यात येणार नसल्याचं शिरसाटांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या