मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Diamond Market : मुंबईतील हिरे व्यापार सूरत हायमंड बोर्सला शिफ्ट झाला? देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेत स्पष्टीकरण

Mumbai Diamond Market : मुंबईतील हिरे व्यापार सूरत हायमंड बोर्सला शिफ्ट झाला? देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेत स्पष्टीकरण

Dec 20, 2023, 08:38 PM IST

  • Devendra Fadnavis on Surat Diamond Bourse : सूरतला नव्या डायमंड बोर्सचे उद्धाटन झाल्याने मुंबईतील हिरे व्यापार सूरतला शिफ्ट होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसेभत याचे उत्तर दिले.

Devendra Fadnavis on Surat Diamond Bourse

Devendra Fadnavis on Surat Diamond Bourse : सूरतला नव्या डायमंड बोर्सचे उद्धाटन झाल्याने मुंबईतील हिरे व्यापार सूरतला शिफ्ट होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसेभत याचे उत्तर दिले.

  • Devendra Fadnavis on Surat Diamond Bourse : सूरतला नव्या डायमंड बोर्सचे उद्धाटन झाल्याने मुंबईतील हिरे व्यापार सूरतला शिफ्ट होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसेभत याचे उत्तर दिले.

सूरतमध्ये जगातील सर्वात मोठे कार्यालय सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन झाल्यामुळे मुंबईतील हिरे व्यापार सुरतला स्थलांतरित झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं आहे.सुरत डायमंड बोर्सचे उदघाटन झाले, हे खरे आहे. पण, सुरत डायमंड बोर्स आणि मुंबईत असलेला भारत डायमंड बोर्स या दोन्हीच्या कार्यपद्धतीत फरक आहे.  सुरत हे मॅन्युफॅक्चरिंग हब, तर मुंबई हे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट हब आहे. तसेच मुंबईच्या डायमंड हबमधून एकही उद्योग सुरतला गेलेला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हिरे व्यवसाय आहे. डायमंड बोर्सचे काम २०१३ मध्येच सुरु झालं होते. आता त्यातील एका नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. मुंबई आणि सूरत दोन्ही डायमंड बोर्सच्या कार्यपद्धतीत फरक आहे. सूरतमध्ये उत्पादन होतं आणि आपल्याकडे उत्पादन आणि निर्यात होते. सूरतला नवा बोर्स सुरु केला असला तरीही आपल्याकडून एकही उद्योग तिथे शिफ्ट झालेला नाही.

मुंबईतील भारत डायमंड गुड्सच्या लोकांनी सांगितलं आम्ही कुणीही शिफ्ट होणार नाही. उलट आपल्याकडे हिरे उद्योग वाढतो आहे. भारतात ३८ बिलियन जेम्स अँड ज्वेलरीची ७५ टक्के निर्यात ही एकट्या मुंबईतून होते. त्यात सूरतचा वाटा १२ टक्के आहे, जयपूरचा वाटा ३.११ टक्के आहे. तर पॉलिश डायमंडच्या एकूण निर्यातीपैकी ९७ टक्के निर्यात एकट्या मुंबईतून होते.

कोरोना काळात हिरे व्यापार बंद होता. मी तेव्हा माजी मुख्यमंत्र्यांना निर्यात सुरू करण्यास परवानगी द्या, असं पत्र लिहिलं होतं. त्यांनी ती संमती शेवटी दिली.मात्र त्यामुळे काय झाले मुंबईचा टक्का ९४.२५ इतका खाली आला तर सूरतचा टक्का वाढून ५.५७ झाले. मात्र आता २०२३-२४ नोव्हेंबरपर्यंत मुंबई ९७.१३ टक्के तर सूरत आधीपेक्षाही कमी म्हणजे २.५७ टक्क्यांवर आली आहे.

काय म्हणाले फडणवीस –

 

  • मुंबईत जेम्स आणि ज्वेलरी पार्कला जागा दिली आहे. २० एकर जागा महापे या ठिकाणी दिली आहे.
  • देशातला सर्वात आधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्कतयार होत आहे. इटली आणि तुर्की या ठिकाणी असलेल्या पार्कप्रमाणेच तो पार्क असणार आहे.
  • या पार्कसाठी ५ एफएसआय, वीजदरात सवलत, जीएसटीतून दिलासा असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
  • स्टडेड गोल्ड ज्वेलरी निर्यातीत मुंबई ६६.५१ तर सुरत ९.९६
  • प्लेन गोल्ड ज्वेलरी निर्याती मुंबई २७.३२ टक्के, सुरत८.७९टक्के
  • मध्यंतरी युएई आणि भारत सरकार यांच्यात एक करार झाला. त्यात मुंबईला उत्पादन केंद्र म्हणून भक्कम करणार.
  • देशातील मोठी ज्वेलरी कंपनीमलबार गोल्डची ऑक्टोबरमध्ये १७०० कोटींची गुंतवणूक. तनिष्क कंपनीही डायमंड क्षेत्रात गुंतवणूक करते आहे आणि तुर्की डायमंड बुर्स सुद्धा मुंबईत येतो आहे.
  • पंतप्रधान मोदींनी २०२३ पर्यंत हिरे उद्योग ७५ बिलियन डॉलर्स इतका मोठा व्हावा, अशी अपेक्षा केली आहे. याचा मोठा फायदा मुंबईलाच होणार आहे. मुंबई ही मुंबई आहे. त्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.

पुढील बातम्या