मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Accident News : देवदर्शनाहून परताना रिक्षाला भरधाव ट्रकने चिरडलं; एकाच कुटूंबातील ४ जण जागीच ठार, ३ गंभीर

Accident News : देवदर्शनाहून परताना रिक्षाला भरधाव ट्रकने चिरडलं; एकाच कुटूंबातील ४ जण जागीच ठार, ३ गंभीर

Aug 28, 2023, 11:25 PM IST

  • Dharashiv Accident : कर्नाटकहून देवदर्शन करून परतणाऱ्या कुटूंबावर काळाने घाला घातला. रिक्षाला भरधाव ट्रकने चिरडल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात  धाराशिव मध्ये  कर्नाटक सीमेवर झाला. 

Dharashiv Accident

Dharashiv Accident : कर्नाटकहून देवदर्शन करून परतणाऱ्या कुटूंबावर काळाने घाला घातला. रिक्षाला भरधाव ट्रकने चिरडल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात धाराशिव मध्ये कर्नाटक सीमेवर झाला.

  • Dharashiv Accident : कर्नाटकहून देवदर्शन करून परतणाऱ्या कुटूंबावर काळाने घाला घातला. रिक्षाला भरधाव ट्रकने चिरडल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात  धाराशिव मध्ये  कर्नाटक सीमेवर झाला. 

धाराशीव जिल्ह्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कर्नाटकहून हैदराबादकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयानक होता की रिक्षाचा चक्काचूर झाला होता. 

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून ३ गंभीर जखमी आहेत. सर्व मृत व जखमी धाराशीवमधील सुंदरवाडी गावातील रहिवाशी आहेत. त्यांच्या ऑटोला तळमोडजवळ कर्नाटकच्या हद्दीत भरधाव ट्रकने चिरडले. या धडकेत ऑटो मधील चौघाचा मृत्यू झाला असून तीन जखमी आहेत तर एक बालक सुखरूप बचावले आहे. ही घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.

सुनील महादेव जगदाळे (वय ४०, ऑटो चालक) पत्नी प्रमिला सुनील जगदाळे (वय ३५), सुनीलची आई अनुसया महादेव जगदाळे (वय ७०), पूजा विजय जाधव,  (वय १८, भाची)  यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे  कुटुंब मुरुम साखर कारखाना शेजारच्या विठ्ठल मंदिराचे पुजारी आहेत.

मृत सुनील आपल्या मालकीच्या (MH२४- M –१३१९) या पियाजिओ एप्पे ऑटोमधून देवदर्शनासाठी कर्नाटक मधील अमृत कुंड येथे गेले होते. देवदर्शनावरून परतताना हैद्राबादहुन सोलापूरकडे जाणाऱ्या (KA५६- ०५७५) ट्रकने जोरदार धडक दिली. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या