मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dhangar Morcha : अनुसूचित जमातीचा दर्जा द्या; धनगर समाजाचा तुळजापुरात विराट मोर्चा

Dhangar Morcha : अनुसूचित जमातीचा दर्जा द्या; धनगर समाजाचा तुळजापुरात विराट मोर्चा

Sep 18, 2023, 09:43 PM IST

  • Dhangar Morcha : धनगर समाजाला अनुसूचित जमाती  प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी तुळजापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला.

Dhangar Morcha

DhangarMorcha : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी तुळजापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला.

  • Dhangar Morcha : धनगर समाजाला अनुसूचित जमाती  प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी तुळजापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला.

धाराशीव – मराठा आरक्षण व कुणबी प्रमाणपत्रावरून महाराष्ट्राचे राजकारण पेटलं असताना आता यामध्ये धनगर समाजानेही उडी घेतली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (भटक्या) प्रवर्गाचा दर्जा बहाल करून तसे आरक्षण मिळावे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नळदुर्ग व तुळजापुरात स्मारक व्हावे, यासह विभिन्न मागण्यांसाठी धनगर समाजाच्यावतीने सोमवारी तुळजापूर शहरात विराट मोर्चा काढण्यात आला. जुना बसस्थानक चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दीपक चौक, भवानी रोड, महाद्वार रोड, आर्य चौक, कमान वेस, मंगळवार पेठ, तहसील कार्यालय, नगरपरिषद कार्यालय येथून येऊन जुना बसस्थानक चौकात आला व तेथे आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.  डोक्यावर पिवळी टोपी घालून धनगर समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक तुळजापूर व नळदुर्ग शहरात उभारावे, या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले

मोर्चात आमदार राणाजगजितसिंह पाटील सहभागी झाले होते. धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. तुळजापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जागा उपलब्ध करून पुतळा उभारला जाईल. त्यासाठी ५० लाखांचा निधी देण्याचा शब्द आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिला. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या