मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Girish Mahajan : गिरीश महाजनांवर CBI ने गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीस म्हणाले..

Girish Mahajan : गिरीश महाजनांवर CBI ने गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीस म्हणाले..

Sep 27, 2022, 05:53 PM IST

    • महाजनांवर सीबीआयने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच फडणवीसांनी गिरीश महाजनांवर (Girish Mahajan) सीआयडीकडे दाखल गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.
गिरीश महाजनांवरCBIने गुन्हा दाखल केल्याची चर्चा

महाजनांवर सीबीआयने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.तसेच फडणवीसांनी गिरीश महाजनांवर (GirishMahajan) सीआयडीकडे दाखल गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.

    • महाजनांवर सीबीआयने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच फडणवीसांनी गिरीश महाजनांवर (Girish Mahajan) सीआयडीकडे दाखल गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.

मुंबई - भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (GirishMahajan) यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. यानंतर राजकीय वतुर्ळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महाजनांवर सीबीआयने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.तसेच फडणवीसांनी गिरीश महाजनांवर सीआयडीकडे दाखल गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती दिली. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

फडणवीस म्हणाले की, त्याच प्रकरणात मी एक पेन ड्राईव्ह दिला होता.त्यामुळे गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र असेल,आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र असेल या सर्व गोष्टींचा पेन ड्राईव्हच्या माध्यमातून खुलासा झाला होता. आता त्याची चौकशी सीबीआय करते आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले,सीबीआयने गिरीश महाजनांवर कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. यापूर्वी जो गुन्हा सीआयडीकडे दाखल झाला होता, तो आम्ही सीबीआयला हस्तांतरीत केला आहे. त्याच प्रकरणात मी एक पेन ड्राईव्ह दिला होता. त्या पेन ड्राईव्हमध्ये कशाप्रकारे खोट्या केसेस दाखल केल्या होत्या याचा खुलासा केला होता. तसेच यामागे कोण आहेत तेही समोर आलं होतं. हे प्रकरण आता सीबीआयकडे गेलं आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या