मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahaparinirvan Diwas : ६ डिसेंबरला मुंबई-ठाण्यात सार्वजनिक सुटी जाहीर करा! महापरिनिर्वाण दिनानिमित्त मागणी

Mahaparinirvan Diwas : ६ डिसेंबरला मुंबई-ठाण्यात सार्वजनिक सुटी जाहीर करा! महापरिनिर्वाण दिनानिमित्त मागणी

Dec 05, 2023, 04:29 PM IST

  • 6th December Mahaparinirvana Day : ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

Mahaparinirvana Day

6th December Mahaparinirvana Day : ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

  • 6th December Mahaparinirvana Day : ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, ६ डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायींसाठी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी एक खास मागणी केली आहे. या दिवशी सर्वांनाच चैत्यभूमीवर अभिवादन करणं शक्य व्हावं, यासाठी मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुटी जाहीर करा, अशी मागणी करणारं पत्र प्रा. वर्षा गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य जातिवाद दूर करण्यासाठी आणि गरीब, दलित व मागास वर्गीयांच्या विकासासाठी समर्पित केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत असतात. मात्र, या दिवशी सर्व कार्यालये सुरू असल्याने अनेक अनुयायींना महामानवास अभिवादन करणे शक्य होत नाही. राज्यातील अनेक संघटना याच पार्श्वभूमीवर बऱ्याच वर्षांपासून सुटी मिळावी, अशी मागणी करत आहेत. त्यातच ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी समन्वय समितीने मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबतची शिफारस शासनाला केली आहे, अशी माहिती प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

सध्या सभोवतालचं सामाजिक वातावरण फार संभ्रमात्मक दिसत आहे. अनेक ठिकाणी जातीय तेढ निर्माण होत आहे. प्रत्येक ठिकाणी एकमेकांचे वाभाडे काढले जात आहेत. अशा वेळी बाबासाहेबांचे समता व बंधुता हे विचार जनसामान्यांमध्ये रूजणे फार गरजेचं आहे. त्यासाठीच या दिवशी म्हणजेच बाबासाहेबांच्या ६७व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, नवी मुंबई या परिसरात सुटी जाहीर करावी, अशी मागणी करणारं पत्र प्रा. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या