मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dapoli Sai Resort Case : दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपपत्रात अनिल परबांचे नावच नाही, ईडीकडून दिलासा?

Dapoli Sai Resort Case : दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपपत्रात अनिल परबांचे नावच नाही, ईडीकडून दिलासा?

May 09, 2023, 05:04 PM IST

  • Sai resort case anil parab :  दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने नुकतेच आरोपपत्र सादर केले आहे. यामध्ये दोन जणांची नावे आहेत. मात्र अनिल परब यांचे नाव वगळल्याने वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Dapoli Sai resort case

Sairesort case anil parab : दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने नुकतेच आरोपपत्र सादर केले आहे. यामध्ये दोन जणांची नावे आहेत. मात्र अनिल परब यांचे नाव वगळल्याने वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

  • Sai resort case anil parab :  दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने नुकतेच आरोपपत्र सादर केले आहे. यामध्ये दोन जणांची नावे आहेत. मात्र अनिल परब यांचे नाव वगळल्याने वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सक्तवसुली संचालनालयाने दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात नुकतेच आरोपपत्र सादर केले आहे. यामध्ये दोन जणांवरुद्धआरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे किरीट सोमय्याव अन्य भाजप नेत्यांनी साई रिसॉर्टबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परब यांच्यावर आरोपांची राळ उठवली होती. त्यांचे नावच या आरोपपत्रात नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

ईडीने आणि विरोधकांनी अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्टचे बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप केला होता. पण ज्याप्रमाणे आरोप केले जात होते, त्याप्रमाणे आरोपपत्रात नाव न आल्याने याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, दापोली तालुक्यातील मुरूड येथील साई रिसॉर्ट बांधकामप्रकरणी मनी लाँड्रिंगचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ईडीने काल (८ मे) सदानंद कदम आणि माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांच्यावर विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.


आरोपपत्रात अनिल परब यांचे नाव नाही. आरोपपत्रात त्यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने त्यांना ईडीने दिलासा दिला आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत गुन्ह्यांचे एकूण उत्पन्न १०.२ कोटी रुपये होते, असे आरोपत्रात म्हटले आहे.


विरोधकांनी आरोप केला होता की, रिसॉर्ट बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करण्यात आले होते. केंद्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणी अनिल परब यांची चौकशी केली होती. पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर मनी लाँड्रिंगचे प्रकरण उघडकीस आले आहे.

 



या प्रकरणाची चौकशी करताना दापोली येथील साई रिसॉर्ट जप्त केले होते, ज्याची किंमत १० कोटींहून अधिक आहे. परब यांनी कदम यांच्याशी मिळून स्थानिक उपविभागीय कार्यालयाकडून केवळ कृषी जमिनीचे एनए वापरासाठी रूपांतरित करण्यासाठी बेकायदेशीर परवानगी घेतली आणि सीआरझेडचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधल्याचे ईडीने म्हटले आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या