मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldhana : दहीहंडीच्या कार्यक्रमाला गालबोट.. इमारतीची गॅलरी कोसळून चिमुकली ठार

Buldhana : दहीहंडीच्या कार्यक्रमाला गालबोट.. इमारतीची गॅलरी कोसळून चिमुकली ठार

Sep 07, 2023, 11:34 PM IST

  • Buldhana News : दहीहंडी कार्यक्रम सुरू असतानाच अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे दहीहंडीसाठी बांधलेल्या दोरीसह गॅलरी कोसळली.

सांकेतिक छायाचित्र

Buldhana News : दहीहंडी कार्यक्रम सुरू असतानाच अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे दहीहंडीसाठी बांधलेल्या दोरीसह गॅलरी कोसळली.

  • Buldhana News : दहीहंडी कार्यक्रम सुरू असतानाच अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे दहीहंडीसाठी बांधलेल्या दोरीसह गॅलरी कोसळली.

राज्यासह देशभरात दहीहंडीचा उत्साह असतानाच बुलढाण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. दहीहंडी कार्यक्रम सुरू असतानाच अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे दहीहंडीसाठी बांधलेल्या दोरीसह गॅलरी कोसळली. या अपघातात एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज रात्री आठच्या सुमारास शहरातील मानसिंग पुरा येथे घडली आहे. गॅलरी कोसळून झालेल्या या अपघातात अन्य एक मुलगी जखमी झाली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

निदा रशीद खान पठाण (वय ९ वर्ष) असे मृत मुलीचे नाव आहे. जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीसाठी गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेल्या एका घराच्या गॅलरीवर दोरी बांधली होती. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा वर चढले होते. 

दहीहंडीला बांधलेल्या दोरीला तरुण लटकले होती. त्यावेळी  त्यावेळी सिमेंटच्या पिलरसह लोखंडी गॅलरी खाली कोसळली. या दुर्घटनेत खाली उभे राहून दहीहंडी पाहणाऱ्या निदा पठाण ही चिमुकली जागीच ठार झाली.

या अपघातात अल्फिया शेख हाफिज (वय ८) जखमी झाली असून तिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली. प्राथमिक उपचारानंतर अल्फिया हिला जालना येथे हलविण्यात आले. मृत निदा पठाण हिचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला. दहीहंडीच्या कार्यक्रमात घडलेल्या या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या