मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dahi handi : मृत्यूशी झुंज अपयशी.. सातव्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

Dahi handi : मृत्यूशी झुंज अपयशी.. सातव्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

Aug 23, 2022, 12:16 AM IST

    • Dahi Handi Govinda Death : विलेपार्लेमध्ये दहीहंडी फोडताना सातव्या थरावरून पडून एक गोविंदा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सातव्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

Dahi Handi Govinda Death : विलेपार्लेमध्ये दहीहंडी फोडताना सातव्या थरावरून पडून एक गोविंदा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    • Dahi Handi Govinda Death : विलेपार्लेमध्ये दहीहंडी फोडताना सातव्या थरावरून पडून एक गोविंदा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुंबई – शुक्रवारी राज्यभर दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. यावेळी विलेपार्लेमध्ये दहीहंडी फोडताना सातव्या थरावरून पडून एक गोविंदा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. संदेश प्रकाश दळवी (वय २२ वर्षे) असे मृत्यू झालेल्या गोविंदाचे नाव आहे. तो (Dahi Handi Govinda Death) शिवशंभो गोविंदा पथकाचा सदस्य होता. 

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

संदेश दळवी विलेपार्लेमध्ये मानवी पिरॅमिडवरून पडून जखमी झाल्यानंतर त्याला शिवसेना कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केलं होते. तो दोन दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण यात त्यांना यश आलं नाही. संदेश दळवीच्या पश्चात आई-वडील आणि तीन भावंडं आहेत. मूळचा पार्ल्याचा असलेला संदेश सध्या कुर्ल्याला राहत होता.

सरकारने १० लाखांचं विमा कव्हर पहिल्यांदा दिलं होतं. सरकार या गोविंदाच्या कुटुंबाला सर्व मदत देईल, असे आश्वासन प्रवीण दरेकर यांनी दिले आहे. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या