मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोरच शिवसेनेच्या दोन गटात राडा.. मुख्यमंत्री शिंदे अन् आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोरच शिवसेनेच्या दोन गटात राडा.. मुख्यमंत्री शिंदे अन् आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Nov 16, 2023, 11:47 PM IST

  • Thackeray group vs shinde group clash : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि  ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Thackeray group vs shinde group clash

Thackeray group vs shinde group clash : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्येमोठा राडा झाला आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Thackeray group vs shinde group clash : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि  ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्येमोठा राडा झाला आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे. आज आमचे कार्यकर्ते दर्शन घेऊन जात असताना ठाकरे गटाचे कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी काहीही कारण नसताना तेथे घोषणाबाजी केल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

यावर आपली प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. जे पक्ष चोरणारे लोक आहेत, यांना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांनी त्यांचं नाव आणि फोटो वापरून राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे.

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी कोणतेही गालबोट लागू, नये यासाठी कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. या प्रकारावर शिंदे म्हणाले की, उबाठाच्या कार्यकर्त्यांनी उगाच वाद सुरू केला. बाळासाहेबाच्या दिनाला कोणत्याही वाद नको, कोणतं गालबोट नको यासाठी आम्ही आदल्या दिवशी स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतो. नतमस्तक होतो. यासाठी मी आज आमदार आणि खासदार, पदाधिकाऱ्यासोबत तेथे जाऊन दर्शन घेतलं. मात्र त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला.

आदित्या ठाकरे म्हणाले की, ते महाराष्ट्रात वातावरण बिघडवून दंगली घडवत आहेत. हे सगळं शिंदे सरकारच्या नावाने सुरु आहे, त्यांना आम्ही लवकरच पळून लावणार.

 

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसैनिकांना वाटलं असेल की, गद्दार लोक तिथे येऊ नये,त्यांनी घोषणा दिल्या असतील. त्यात चुकीचं काय आहे?' 'मुंब्रा आणि बांद्रामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती,ती शाखा तोडली आणि बाळासाहेब यांच्या फोटोवर हातोडा चालवला. त्यांना काय अधिकार आहे तिथे जाण्याचा? यापुढे महाराष्ट्र त्यांना दणक्यात उत्तर देणार आहे. निवडणूक लावण्याची त्यांच्यात हिम्मत नाही. निवडणूक लावल्यास त्यांना उत्तर मिळणार.

पुढील बातम्या