मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Coronavirus: धक्कादायक! मुंबईत कोरोनामुळे चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

Coronavirus: धक्कादायक! मुंबईत कोरोनामुळे चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

May 24, 2023, 05:48 PM IST

  • COVID19 Kills Baby in Mumbai: मुबंईत कोरोनामुळे चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

coronavirus in Maharashtra

COVID19 Kills Baby in Mumbai: मुबंईत कोरोनामुळे चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • COVID19 Kills Baby in Mumbai: मुबंईत कोरोनामुळे चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांवर कायमचे नियंत्रण मिळण्यासाठी आरोग्य प्रशासन प्रयत्न करीत आहे. देशात कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरीही काही भागात अजूनही रुग्ण आढळून येत आहेत. याच दरम्यान, मुंबईकरांची चिंतेत भर घालणारी माहिती समोर आली आहे. मुंबईत मंगळवारी कोरोना व्हायरसमुळे अवघ्या चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या बालकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, व्हायरल इन्फेक्शनमुळे बाळाच्या फुफ्फुसात गंभीर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्याचा मृत्यू झाला, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस व कारचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार, एक बालक गंभीर जखमी

Pune : पुण्यातील घटना! घरावर काळी छाया असल्याचे सांगत गुंगीचे औषध पाजून मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो; १५ लाख उकळले

Sanjay Raut : ८०० कोटींच्या भूखंड घोटाळ्यात एकनाथ शिंदे लाभार्थी; संजय राऊत यांचं थेट मोदींना पत्र

Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक! हरयाणातून घेतले ताब्यात

मुंबईत कोरोनामुळे बळी गेलेला हा सर्वात कमी वयाचा रुग्ण ठरला आहे. या प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांनी मुलाला श्वसनाचा त्रास झाल्याचे किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे त्याच्या फुफ्फुसात गंभीर गुंतागुंत झाल्याचे सांगून अधिक तपशील देण्यास नकार दिला. मात्र, घटनेने पालकांच्या चिंतेत भर आणखी भर घातली आहे.

मुंबईत जुलै २०२२ मध्ये ऊ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. यापूर्वी पुण्याच्या आरोग्य अधिकार्‍यांनी जुलै २०२० मध्ये आठ दिवसांच्या मुलीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद केली होती. देशाच्या इतर भागांतूनही कोविडमुळे नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत.

राज्यात दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात मंगळवारी ३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी १६ रुग्ण मुंबईतील होते. राज्यात जानेवारीपासून १२० कोरोनाबाधितांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. यातील २६ जण मुंबईतील आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या