मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident: लोणी स्टेशन येथे अपघातात दोन शाळेकरी बहिणींचा मृत्यू

Pune Accident: लोणी स्टेशन येथे अपघातात दोन शाळेकरी बहिणींचा मृत्यू

Aug 20, 2022, 09:54 AM IST

    • Accident at Loni Kalbhor in pune : पुण्यात हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथे लोणी स्टेशन येथे झालेल्या अपघातात दोन बहिणींचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात भीषण अपघात (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Accident at Loni Kalbhor in pune : पुण्यात हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथे लोणी स्टेशन येथे झालेल्या अपघातात दोन बहिणींचा मृत्यू झाला आहे.

    • Accident at Loni Kalbhor in pune : पुण्यात हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथे लोणी स्टेशन येथे झालेल्या अपघातात दोन बहिणींचा मृत्यू झाला आहे.

पुणे : पुण्यात सोलापूर मार्गावर कदमवाकवस्ती येथे लोणी स्टेशन चौकात शाळेत जाणाऱ्या दोन बहिणींच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी सातच्या सुमारास घडला.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

छकुली कुमार शीतोळे (वय १७), राजश्री कुमार शीतोळे (वय १०, दोघेही, रा. कावडीपाट, कदमवाकवस्ती (ता. हवेली) अशी मृत्यू झालेल्या दोन बहीणींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छकुली ही ११ वीला शिकते. टर राजश्री ही ६ वीत शिकत आहे. या दोघेही शनिवारी सकाळी नेहमी प्रमाणे सकाळी शाळेत जात होत्या. त्या येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे जात असतांना लोणी स्टेशन चौकात त्यांच्या दुचकीला कंटेनरने धडक दिली. यामुळे दोघी या कंटेनर खाली चिरडल्या गेल्याने दोघींचाही जागेवरच मृत्यू झाला.

पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे. घटनेनंतर कंटेनर चालक हा फरार झाला आहे. या दोघींच्या मृत्यूमुळे कदमवाकवस्ती गावावर शोक कळा पसरली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या