मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident: दुर्दैवी! पुण्यात खड्डयाने घेतला बाप-लेकीचा जीव; हडपसर सासवड मार्गावरील घटना

Pune Accident: दुर्दैवी! पुण्यात खड्डयाने घेतला बाप-लेकीचा जीव; हडपसर सासवड मार्गावरील घटना

Jul 19, 2022, 11:34 AM IST

    • पुण्यातील रस्त्यांवरील खड्डयांमुळे एका बाप-लेकीला जीव गमवावा लागला. खड्डा चुकवण्याच्या नादात एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक देऊन दोघांनाही चिरडले.
Pune Accident (HT_PRINT)

पुण्यातील रस्त्यांवरील खड्डयांमुळे एका बाप-लेकीला जीव गमवावा लागला. खड्डा चुकवण्याच्या नादात एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक देऊन दोघांनाही चिरडले.

    • पुण्यातील रस्त्यांवरील खड्डयांमुळे एका बाप-लेकीला जीव गमवावा लागला. खड्डा चुकवण्याच्या नादात एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक देऊन दोघांनाही चिरडले.

पुणे : पुण्यातील खड्डयांचा विषय गेल्या काही दिवसांपासून चर्चीला जात आहे. या खड्डयांमुळे अपघात होत आहे. याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशीच एक घटना मंगळवारी घडली. सकाळी आपल्या लेकीला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जाणा-या एका बाप लेकीला खड्डा चुकवण्याच्या नादात एका ट्रकने धडक दिल्याने ते ट्रक खाली आल्याने चिरडले गेले. यात दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना हडपसर-सासवड मार्गावर सातववाडी येथील ग्लायडींग सेंटर जवळ घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

या घटनेत नीलेश साळुंखे (वय ३५, रा ढमाळवाडी, फुरसुंगी), मीनाक्षी साळुंखे (वय १०) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या बाप-लेकीचे नाव आहे. या प्रकरणी ट्रक चालक दिलीप कुमार पटेल (रा. रेवा, मध्य प्रदेश) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर नीलेश साळुंखे हे त्यांची मुलगी मिनाक्षी हीला तीच्या साधना विद्यालयात सोडण्यासाठी जात होते. ते फुरसुुंगीवरून हडपसरकडे येत होते. यावेळी सातववाडी येथून त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात एक ट्रक आला. खड्डा चुकवण्याच्या नादात त्याने साळुंखे यांच्या दुचाकीला धडक दिली. निलेश हे ट्रक खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मिनाक्षी ही दुर फेकल्या गेल्याने जखमी झाली. तीला दवाखान्यात तातडीने उचारासाठी नेण्यात आले. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचानामा केला आहे. या अपघाताप्रकरणी दोषी असलेल्या ट्रक चालक आणि त्याचा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या