मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shikrapur Accident : कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Shikrapur Accident : कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Sep 11, 2022, 10:46 AM IST

    • Shikrapur Road Accident : अपघात इतका भयंकर होता की कंटेनरनं कारला तब्बल दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. परंतु सुदैवानं कारमधील चार प्रवासी बालंबाल बचावले आहे.
Road Accident On Pune Nagar Highway (HT)

Shikrapur Road Accident : अपघात इतका भयंकर होता की कंटेनरनं कारला तब्बल दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. परंतु सुदैवानं कारमधील चार प्रवासी बालंबाल बचावले आहे.

    • Shikrapur Road Accident : अपघात इतका भयंकर होता की कंटेनरनं कारला तब्बल दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. परंतु सुदैवानं कारमधील चार प्रवासी बालंबाल बचावले आहे.

Road Accident On Pune Nagar Highway : गेल्या काही दिवासांपासून राज्यातील विविध भागांमधून अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे-नगर महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. भरधाव वेगानं येणाऱ्या कंटेनरनं कारला दोन किलोमीटरपर्यंत अक्षरशः फरफटत नेलं. कारमध्ये चार प्रवासी होते. परंतु सुदैवानं ते सर्व बचावले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर फाट्यानजीक हा अपघात झाला असून त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कंटेनरनं जेव्हा कारला धडक दिली तेव्हा रस्त्यावर आगीच्या ठिणग्या उडत होत्या. त्यामुळं हा अपघात किती भीषण असेल, याची कल्पना येते.

पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर फाट्याजवळ नेहमीच गर्दी आणि वर्दळ असते. अशा वेळी अवजड वाहनांसाठी वेगळी लेन दिलेली आहे. परंतु रात्रीच्या वेळी अवजड वाहनचालक भरधाव वेगानं वाहन चालवत असल्यानं अनेकदा असे अपघात घडलेले आहेत. शिक्रापूरजवळच्या पेट्रोलपंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या अपघाताची दृश्य कैद झाली असून त्या कंटेनर कारला कशा पद्धतीनं फरफटत नेत असल्याचं दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये अपघात होण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या कार अपघातात शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर अहमदाबादहून मुंबईला येताना प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा सन्सचे माजी चेयरमन सायरस मिस्त्री यांचाही कार अपघातात निधन झालं होतं. त्यामुळं आता राज्यातील रोड सेफ्टीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या