मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Crime News : नाशिकमध्ये मध्यरात्री हत्येचा थरार; तरुणाचा भोसकून खून, आरोपीला अटक

Nashik Crime News : नाशिकमध्ये मध्यरात्री हत्येचा थरार; तरुणाचा भोसकून खून, आरोपीला अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 11, 2022 10:16 AM IST

Nashik Crime News : काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून हल्लेखोरानं तरुणाची हत्या केली आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Nashik crime news marathi
Nashik crime news marathi (HT_PRINT)

Nashik crime news marathi : काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये टोळक्याच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता शहरात पुन्हा एकदा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. जून्या वादातून तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करत हत्या करण्यात आल्यानं शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणात आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पंचवटी भागात राहणारा रवी शिंदे हा मध्यरात्री कालिकानगर परिसरातून घरी जात होता. त्यावेळी आरोपी किरण कोकाटे हा रिक्षातून आला आणि रवीवर मागून धारदार शस्त्रानं वार केले. रवीवर हल्ला झाल्यानंतर त्यानं आरडाओरड केली. परंतु आरोपी किरणनं एकामागून एक सपासप वार केल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्रीची वेळ असल्यानं आरोपी किरण कोकाटेनं रवीची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. परंतु या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी किरण कोकाटेविरोधात गुन्हा दाखल केला.

तपास पथकानं आरोपीच्या मुसक्या आवळल्या...

नाशिकच्या पंचवटीत हत्येचं प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक स्थापन केलं होतं. त्यावेळी पथकानं अत्यंत शिताफीनं आणि चालाखीनं आरोपी किरण कोकाटेला सिडको परिसरातून ताब्यात घेतलं. पोलीस तपासात त्यानं रवीच्या हत्येची कबुली दिली आहे.

IPL_Entry_Point

विभाग