मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'जो कोणी काँग्रेसशी नडला, त्याचं राजकारण संपलं आहे', वडेट्टीवारांचा घणाघात

'जो कोणी काँग्रेसशी नडला, त्याचं राजकारण संपलं आहे', वडेट्टीवारांचा घणाघात

Jun 13, 2022, 08:34 PM IST

    • जेव्हा जेव्हा काँग्रेस सोबत जो कोणी नडला त्याचं राजकारण संपलं आहे, असा घणाघात वडेट्टीवारांनी विरोधकांवर केला आहे.
मंत्री विजय वडेट्टीवार

जेव्हा जेव्हा काँग्रेस सोबत जो कोणी नडला त्याचं राजकारण संपलं आहे,असा घणाघात वडेट्टीवारांनी विरोधकांवर केला आहे.

    • जेव्हा जेव्हा काँग्रेस सोबत जो कोणी नडला त्याचं राजकारण संपलं आहे, असा घणाघात वडेट्टीवारांनी विरोधकांवर केला आहे.

मुंबई- नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Heraldcase) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. राहुल गांधी यांची आज सकाळी ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली.राहुल गांधींची ईडीने जवळपास तीन तास चौकशी केली. सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ईडीच्या कार्यालयात त्यांना आज हजर राहता आले नाही. दरम्यान,गांधी कुटुंबीयांना केंद्र सरकारने (central government) सूडभावनेने ईडीकरवी नोटीस पाठवल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Lok Sabha : वरळीत पोलिंग बूथवर काम करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

Bhiwandi Accident: भिवंडीत कारच्या धडकेत ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

ईडीच्या कारवाईविरोधातकाँगेसने आक्रमक पवित्रा घेतला असून केंद्र सरकारवरकाँगेसच्या मंत्र्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही ईडीच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेस सोबत जो कोणी नडला त्याचं राजकारण संपल आहे,असा घणाघात वडेट्टीवारांनी विरोधकांवर केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, गांधी परिवाराला नोटीस देऊन मोदी घाबरून गेले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. २०२४ मध्ये देशात काँग्रेस सरकार येईल, याची सुरुवात आजपासून झाली आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेस सोबत जो कोणी नडला त्याचं राजकारण संपलं आहे. मलाही नोटीस आली आहे. भाजप मध्ये नेते गेले की ते स्वच्छ होतात. चार रस्ते बनवून विकास होत नाही,देशात बेरोजगारी वाढली आहे. सामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी गांधी परिवारावर हा प्रयोग करण्यात आला आहे.

आज ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है -नितीन राऊत

राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले,जेव्हा इंदिरा गांधींना अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा देशातील कायदा सुव्यवस्था ढासळून पडली होती. ज्या राहुल गांधींनी आजी-आजोबा,वडिलांच्या शरीराचे तुकडे तुकडे पाहिलेत. ते राहुल गांधी ईडीला घाबरणार नाहीत.'आज ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है'. जेवढं आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढं आम्ही पेटून उठू,असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या