मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Congress Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्वीस्ट; काँग्रेस आमदाराच्या पोस्टवरून चर्चांना उधाण

Congress Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्वीस्ट; काँग्रेस आमदाराच्या पोस्टवरून चर्चांना उधाण

Jul 11, 2023, 12:50 PM IST

    • Congress Leader Facebook Post : राष्ट्रवादीत मोठी फूट पडलेली असतानाच आता काँग्रेसमध्ये मोठ्या हालचालींना वेग आला आहे.
Maharashtra Congress (HT)

Congress Leader Facebook Post : राष्ट्रवादीत मोठी फूट पडलेली असतानाच आता काँग्रेसमध्ये मोठ्या हालचालींना वेग आला आहे.

    • Congress Leader Facebook Post : राष्ट्रवादीत मोठी फूट पडलेली असतानाच आता काँग्रेसमध्ये मोठ्या हालचालींना वेग आला आहे.

Vijay Wadettiwar Facebook Post : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळं पक्षात मोठी फूट पडली असून दोन गट निर्माण झाले आहे. तसेच राज्याला फडणवीसांनंतर दुसरा उपमुख्यमंत्री मिळाला आहे. अजित पवारांच्या बंडानंतर विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडेच असणार असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु आता राष्ट्रवादीला धोबीपछाड देत काँग्रेस थेट विरोधी पक्षनेतेपदावर दावा ठोकला आहे. काँग्रेसकडे राष्ट्रवादी आणि ठाकरे गटापेक्षा जास्त संख्याबळ आहे. त्यामुळं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टवरून विरोधी पक्षनेते होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळं आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या फेसबुक खात्यावरून एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात विजय वडेट्टीवार यांचा फोटो आहे. त्यात वडेट्टीवार हेच राज्याचे नवे विरोधी पक्षनेते होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांनी स्वत:च विरोधी पक्षनेता होणार असल्याची पोस्ट शेयर केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Vijay Wadettiwar Facebook Post

यापूर्वी विरोधी पक्षनेतेपद संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं. परंतु अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने हे पद रिक्त झालं आहे. वडेट्टीवार यांच्या फेसबुक पोस्टनंतर काँग्रेसच्या शीर्ष नेत्यांकडून यावर कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. त्यामुळं आता महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना यापूर्वी देखील राज्याचं विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे. ते चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये विजय वडेट्टीवार यांनी मदत व पुनवर्सन खात्याची जबाबदारी संभाळली होती. त्यामुळं आता पक्षातील वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांना मागे सारत विजय वडेट्टीवार यांनी थेट विरोधी पक्षनेतेपदावर दावा ठोकल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

पुढील बातम्या