Nagpur Crime News Marathi : महाराष्ट्रात डान्सबारबंदी असतानाच नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये तरुणीने चक्क बिकीनी घालून अश्लील डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं आता महाराष्ट्रात उत्तर प्रदेश आणि बिहारप्रमाणे डान्स शो सुरू करण्यात आल्याने अनेकांनी संताप व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात तरुणीने अश्लील डान्स केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये तरुणीने अश्लील डान्स केला असून या प्रकरणात अद्याप कोणती कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही. परंतु या घटनेचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील एका खाजगी सोलर कंपनीकडून हॉटेलमध्ये तरुणीचा डान्स शो आयोजित करण्यात आला होता. त्यात तरुणीने चक्क बिकीनी घालत तोकड्या कपड्यांवर अश्लील डान्स केला आहे. यावेळी तरुणांनी शिट्ट्या वाजवत आणि पैशांची उधळण करत तरुणीच्या अश्लील डान्सला प्रतिसाद दिला आहे. हा सर्व प्रकार व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने स्मार्टफोनमध्ये व्हिडिओ शूट करत त्याला व्हायरल केलं आहे. त्यात तरुणाई शिट्ट्या वाजवत अश्लील नृत्य करत असलेल्या तरुणीवर पाचशे-हजारांच्या नोटा उधळत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता संबंधित हॉटेलमालक आणि पैशाची सिनेस्टाईल उधळण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात कोणत्याही हॉटेल, पब आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये होणाऱ्या कार्यक्रमांसाठी नियमावली जारी करण्यात आलेली आहे. नागपूर पोलिसांकडून कडक दिशानिर्देश जारी असताना देखील हॉटेलमधील कार्यक्रमात तरुणीने अश्लील डान्स कसा काय केला?, असा सवाल उपस्थित होत आहे. नागपुरातील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. तसेच दोषी हॉटेलमालक आणि कार्यक्रमाच्या आयोजिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.