मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rahul Gandhi Probe: हर्षवर्धन पाटलांचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसचा भाजपवर हल्ला

Rahul Gandhi Probe: हर्षवर्धन पाटलांचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसचा भाजपवर हल्ला

Jun 15, 2022, 12:24 PM IST

    • Sachin Sawant shares Harshvardhan Patil's Video: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून सध्या चौकशी सुरू आहे. ही चौकशी म्हणजे राजकीय सूडभावनेची कारवाई असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. 
Rahul Gandhi (Ayush Sharma)

Sachin Sawant shares Harshvardhan Patil's Video: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून सध्या चौकशी सुरू आहे. ही चौकशी म्हणजे राजकीय सूडभावनेची कारवाई असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे.

    • Sachin Sawant shares Harshvardhan Patil's Video: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून सध्या चौकशी सुरू आहे. ही चौकशी म्हणजे राजकीय सूडभावनेची कारवाई असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. 

National Herald Case: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (Enforcement Directorate) चौकशी सुरू आहे. चौकशीचा आजचा सलग तिसरा दिवस आहे. गांधी कुटुंबाला नाहक त्रास दिला जात असल्याबद्दल काँग्रेस पक्षानं केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा एक व्हिडिओ शेअर करत काँग्रेसनं भाजपच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. (Sachin Sawant Slams BJP)

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशीसाठी ईडीनं सोनिया गांधी व राहुल गांधी यांना समन्स बजावलं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळं सोनिया गांधी सध्या चौकशीला उपस्थित राहिलेल्या नाहीत. मात्र, राहुल गांधी यांची गेल्या दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते या कारवाईचा निषेध करत पहिल्या दिवसापासून ईडीच्या ठिकठिकाणच्या कार्यालयसमोर आंदोलन करत आहेत.

गांधी कुटुंबावरील या कारवाईवरून काँग्रेसच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष व केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा आहे. पाटील हे सध्या भाजपमध्ये आहेत. इंदापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना आपण भाजपमध्ये का गेलो, याची कारणमीमांसा पाटील यांनी केली आहे. भाजपमध्ये असल्यामुळं निवांत झोप लागते, चौकशी वगैरे काही नाही असं ते सांगताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करत केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर नेमका कशासाठी केला जात आहे, याकडं सचिन सावंत यांनी लक्ष वेधलं आहे.

‘राहुल गांधी यांची तिसऱ्या दिवशीही चालू ठेवलेल्या चौकशीतून ED चे अधिकारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा विखार शमवत आहेत. अत्याचार करणारे सत्ताधीश घाबरट असतात, त्यांना सत्ता जाईल याची भीती असते, असं सावंत यांनी म्हटलं आहे. ‘भाजपनं हर्षवर्धन पाटील यांना भाजपचा ब्रँड अँबॅसिडर करावं. भाजपचं खरं स्वरूप हेच आहे,’ असा टोला त्यांनी हाणला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या