मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Balasaheb Thorat : नागपुरात मॉर्निंग वॉक करताना बाळासाहेब थोरात पडले, अधिवेशन सोडून मुंबईला परतणार

Balasaheb Thorat : नागपुरात मॉर्निंग वॉक करताना बाळासाहेब थोरात पडले, अधिवेशन सोडून मुंबईला परतणार

Dec 26, 2022, 03:31 PM IST

  • Balasaheb Thorat Injured : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे मॉर्निंग वॉक करताना पडले असून त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे.

Balasaheb Thorat

Balasaheb Thorat Injured : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे मॉर्निंग वॉक करताना पडले असून त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे.

  • Balasaheb Thorat Injured : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे मॉर्निंग वॉक करताना पडले असून त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे.

Nagpur Winter Session : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष पेटला असतानाच काँग्रेसची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात हे मॉर्निंग वॉक करताना पडले असून त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळं ते अधिवेशन अर्धवट सोडून मुंबईला परतणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Gao Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

Mumbai Local Mega Block : रविवारी प्रवासाचे नियोजन करताय? लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

बाळासाहेब थोरात यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘आज सकाळी नागपूरच्या सेमिनरी हिल इथं मॉर्निंग वॉक करताना पडल्यामुळं माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे. मी नागपूर इथं प्राथमिक उपचार घेतले आहेत. माझी तब्येत पूर्णपणे बरी असून काळजी करण्याचं कारण नाही. फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानं मी पुढील उपचार मुंबईत घेणार आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरात यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. मेयो रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. ही दुखापत गंभीर असून शस्त्रक्रियेची गरज भासणार आहे. त्यामुळं थोरात यांना आज दुपारी तातडीनं विशेष विमानानं मुंबईला आणलं जाणार आहे.

 

पुढील बातम्या