मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganesh Nagar Karkhana : गणेशनगर कारखान्याच्या निवडणुकीत विखे पाटलांना मोठा धक्का, थोरातांच्या पॅनलची जोरदार मुसंडी

Ganesh Nagar Karkhana : गणेशनगर कारखान्याच्या निवडणुकीत विखे पाटलांना मोठा धक्का, थोरातांच्या पॅनलची जोरदार मुसंडी

Jun 19, 2023, 04:09 PM IST

    • Radhakrishna Vikhe vs Balasaheb Thorat : गणेशनगर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पॅनलने जोरदार मुसंडी मारली आहे.
Radhakrishna Vikhe vs Balasaheb Thorat (HT)

Radhakrishna Vikhe vs Balasaheb Thorat : गणेशनगर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पॅनलने जोरदार मुसंडी मारली आहे.

    • Radhakrishna Vikhe vs Balasaheb Thorat : गणेशनगर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पॅनलने जोरदार मुसंडी मारली आहे.

Ganesh Nagar Sahakari Sakhar Karkhana Election 2023 : अहमदनगर जिल्ह्यातील गणेशनगर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपा नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांच्या पॅनलने जोरदार मुसंडी मारत सत्तेकडे वाटचाल सुरू केली आहे. काँग्रेसचे तब्बल १८ उमेदवार आघाडीवर असून विखे गटाचा केवळ एक उमेदवार विजयी झाल्याची माहिती आहे. त्यामुळं आता नगरमध्ये भाजपाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विखे आणि थोरात यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता.

ट्रेंडिंग न्यूज

Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

Maharashtra Weather Update:राज्यावर अवकाळीचे संकट! पुणे, नाशिक, नगरसह बहुतांश जिल्ह्यात बरसणार! बाहेर पडतांना काळजी घ्या

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अहमदनगर जिल्ह्यातील कट्टर राजकीय वैरी असलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे गणेशनगर कारखान्याच्या निवडणुकीत आमने-सामने आले होते. बाळासाहेब थोरात यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेयरमन विवेक कोल्हे यांच्याशी युती केली होती. याशिवाय राधाकृष्ण विखे यांनी देखील निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार ताकद लावली होती. परंतु या निवडणुकीचे निकाल हाती येत असून विखे गटाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तर थोरात आणि कोल्हे गटाचे १८ उमेदवार आघाडीवर आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे महसूलमंत्री झाले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी महसूल खात्यातील गैरव्यवहारांवरून गंभीर आरोप केले होते. त्यानंतर गणेशनगरची निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची झाली होती. परंतु आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विवेक कोल्हेंना सोबत घेत विखेंच्या पॅनलचा धुव्वा उडवला आहे.

पुढील बातम्या