मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “..म्हणूनच फडणवीसांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय”; मिटकरींचा सदाभाऊ खोतांना चिमटा

“..म्हणूनच फडणवीसांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय”; मिटकरींचा सदाभाऊ खोतांना चिमटा

Jun 13, 2022, 09:21 PM IST

    • खोत यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांनी खोत यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याचा शाब्दिक टोला ट्विटरवरुन खोत यांना लगावला आहे.
मिटकरींचा सदाभाऊ खोतांना चिमटा

खोत यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांनी खोत यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याचा शाब्दिक टोला ट्विटरवरुन खोत यांना लगावला आहे.

    • खोत यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांनी खोत यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याचा शाब्दिक टोला ट्विटरवरुन खोत यांना लगावला आहे.

मुंबई – राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकीचा रणधुमाळी सुरू आहे. १० जागेसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने विधानपरिषदेची निवडणूकही राज्यसभेप्रमाणेच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. आज अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. खोत यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांनी खोत यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याचा शाब्दिक टोला ट्विटरवरुन खोत यांना लगावला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

२० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक गुप्त पद्धतीने होणार असल्याने मोठा दगाफटका होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. शेवटच्या पंधरा मिनिटांपर्यंत कोणत्याही पक्षाकडून अर्ज मागे घेण्यात आला नव्हता. पण अखेरच्या क्षणी सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपाकडून पाच उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले जातील,हे स्पष्ट झालं आहे. सदाभाऊ खोत यांनी भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता.

अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना खोत यांनी, “भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस जे काही निर्णय घेतील,तो आम्हाला मान्य असेल,”अशी प्रतिक्रिया दिली. याचवरुन मिटकरींनी खोत यांच्यावर निशाणा साधला. “सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय,”असं मिटकरींनी ट्विटरवरुन म्हटलंय.“आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही,”असंही म्हटलंय.

पुढे बोलताना मिटकरी यांनी, “भाऊ त्या फडणवीसांना सांगा,म्हणावं, “म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय. आणखी दोन पावलं माग येऊन सन्या गुमान बसल,”असं म्हणत खास गावरान भाषेत खोत यांना मिटकरींनी शाब्दिक चिमटा काढलाय.

पुढील बातम्या