मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Banda News : आरती करताना करंट लागल्याने कंडक्टरचा दुर्दैवी मृत्यू, गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात शोककळा

Banda News : आरती करताना करंट लागल्याने कंडक्टरचा दुर्दैवी मृत्यू, गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात शोककळा

Sep 18, 2023, 12:19 PM IST

    • Sindhudurg News : गणपतीची पूजा करत असताना इलेक्ट्रिक शॉक लागल्याने एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Banda Sindhudurg Konkan News (HT_PRINT)

Sindhudurg News : गणपतीची पूजा करत असताना इलेक्ट्रिक शॉक लागल्याने एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Sindhudurg News : गणपतीची पूजा करत असताना इलेक्ट्रिक शॉक लागल्याने एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Banda Sindhudurg Konkan News : उद्यापासून राज्यातील अनेक शहरांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. कोकणातील अनेक ठिकाणी लोकांनी आजच गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात केली आहे. परंतु आता राज्यातील गणेशभक्तांच्या काळजाचा ढोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. गणपतीची पूजा करत असताना वीजेचा शॉक लागल्याने एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा तालुक्यातल्या सरमळे-देऊळवाडीत ही घटना घडली आहे. रमाकांत शिवराम परब असं मृत्यमुखी पडलेल्या भाविकाचं नाव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रमाकांत शिवराम परब हे आपल्या राहत्या घरी गणपतीची पूजा करत होते. त्यावेळी टेबलावरील वायरला त्यांचा धक्का लागला. त्यामुळं वीजेचा शॉक लागल्याने रमाकांत हे खालीच कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. रमाकांत परब हे एका खाजगी बसमध्ये वाहकाचं काम करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळं आता कोकणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी गणेशोत्सवाचा मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळत असतो. मुंबईसह पुण्यात नोकरी करणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणातल्या घरी येत असतात. परंतु गणपतीची आरती करत असताना कोकणातील भाविकाचा मृत्यू झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळं आता गणपतीचा सण साजरा करताना भाविकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

पुढील बातम्या