मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Fund Allocations : मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू नेत्याला मोठा धक्का; तब्बल दीडशे कोटींच्या विकासकामांना स्थगिती

Fund Allocations : मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू नेत्याला मोठा धक्का; तब्बल दीडशे कोटींच्या विकासकामांना स्थगिती

Jul 26, 2023, 11:48 AM IST

    • Shinde-Fadnavis Govt : निधीवाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरू असतानाच आता शिंदे गटातही वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.
Shinde-Fadnavis Govt Fund Allocations (HT)

Shinde-Fadnavis Govt : निधीवाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरू असतानाच आता शिंदे गटातही वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

    • Shinde-Fadnavis Govt : निधीवाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरू असतानाच आता शिंदे गटातही वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

Shinde-Fadnavis Govt Fund Allocations : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या १५० कोटी रुपयांच्या विकासकामांना स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाच्या नेत्यांना डावलून मंत्री तानाजी सावंत हे भाजपच्या नेत्यांना अधिक निधी देत असल्याची तक्रार स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विश्वासू नेत्याला धक्का देत परभणीतील शिंदे गटाच्या नेत्यांना दिलासा दिला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. तानाजी सावंत यांच्यावर जिल्ह्यातील शिंदे गटातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळंच आता मुख्यमंत्र्यांकडून विकासकामांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे आरोग्यमंत्री आणि परभणीचे पालकमंत्री तानाजी सावंत हे स्वत:च्या पक्षातील नेत्यांना डावलून भाजपच्या नेत्याना अधिकचा विकासनिधी देत असल्याची तक्रार स्थानिक शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. तानाजी सावंत यांच्याकडून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भाजपच्या लोकांना निधी दिला जात असल्याचा आरोप शिंदे गटाच्या नेत्यांनी केला होता. यासंदर्भात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून तब्बल १५० कोटींच्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना फोन करून १५० कोटी रुपयांच्या विकासकामांना ब्रेक देण्याच्या सूचना केल्या आहे. परभणीतील स्थानिक शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यात मुख्यमंत्र्यांकडून मध्यस्थी केली जाणार आहे. बैठकीत तोडगा निघाल्यास थांबवण्यात आलेली विकासकामं पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. परभणीतील शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांच्यासह अन्य काही नेत्यांनी तानाजी सावंत यांच्याविरोधात एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं असून त्यानंतर विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे.

पुढील बातम्या