मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rutuja Latke: आमदार, खासदार फोडल्यानंतर आता ठाकरेंच्या सेनेचा उमेदवार फोडण्याचा शिंदे गटाचा प्लान

Rutuja Latke: आमदार, खासदार फोडल्यानंतर आता ठाकरेंच्या सेनेचा उमेदवार फोडण्याचा शिंदे गटाचा प्लान

Oct 12, 2022, 02:24 PM IST

    • Andheri East By-Election 2022 : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
Andheri East Bypoll Election 2022 (HT)

Andheri East By-Election 2022 : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

    • Andheri East By-Election 2022 : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Andheri East By-Election 2022 : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर आता अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या गटाकडून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाकडूनही ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. ऋतुजा लटके यांना भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या युतीकडून उमेदवारी देण्यासाठी मुंबईत हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आल्यानं आता ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मूरजी पटेल यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. परंतु त्यांनी अजून अर्ज भरलेला नाही. त्यासाठी दोन दिवस शिल्लक असल्यानं मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना ऐन शेवटच्या दिवशी धोबीपछाड देण्याची योजना आखल्याचं समजतं. ऋतुजा लटके या शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडूनच उमेदवारी दाखल करतील, अशी माहिती माजी मंत्री अनिल परब यांनी दिली होती. त्यानंतर आता आता शिंदे गट ऋतुजा लटकेंना शिंदे गटात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा अजूनही प्रलंबित...

ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेतील कर्मचारी आहेत. त्यामुळं त्यांना निवडणूक लढण्याआधी बीएमसीतील नोकरीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यांनी राजीनामा दिलेला असून तो अजून बीएमसी प्रशासनानं स्वीकारलेला नाही. त्यामुळं ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

भाजपची भूमिका काय?

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक ही शिंदे आणि ठाकरे गटासाठी आस्तित्त्वाची लढाई असणार आहे. भाजपनं या निवडणुकीसाठी पटेल यांना उमेदवारी जाहीर केलेली असली तरी शिंदे गट या जागेवर दावा करू शकतो. कारण काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी अंधेरीची जागा आम्ही लढू शकतो, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं ऋतुजा लटकेंना शिंदे गटात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं तर ठाकरेंना धोबीपछाड देण्यासाठी भाजप एक पाऊल मागे घेण्याचा विचार करू शकतं.

कधी आहे मतदान?

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या तीन नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याचा निकाल सहा नोव्हेंबरला लागणार असून शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर ठाकरे आणि शिंदे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने येणार आहेत. त्यामुळं या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

पुढील बातम्या