मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  CM Eknath Shinde: माझ्यासोबत अनुभवी फडणवीस, काही कमी पडणार नाही; CM शिंदेंनी केल्या मोठ्या घोषणा

CM Eknath Shinde: माझ्यासोबत अनुभवी फडणवीस, काही कमी पडणार नाही; CM शिंदेंनी केल्या मोठ्या घोषणा

Sep 25, 2022, 02:48 PM IST

    • CM Eknath Shinde: आम्ही धोरणात्मक असे निर्णय घेत आहे. दोन महिन्याचं सरकार आणि महाविकास आघाडीचं अडीच वर्षाचं सरकार यात फरक असल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

CM Eknath Shinde: आम्ही धोरणात्मक असे निर्णय घेत आहे. दोन महिन्याचं सरकार आणि महाविकास आघाडीचं अडीच वर्षाचं सरकार यात फरक असल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.

    • CM Eknath Shinde: आम्ही धोरणात्मक असे निर्णय घेत आहे. दोन महिन्याचं सरकार आणि महाविकास आघाडीचं अडीच वर्षाचं सरकार यात फरक असल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील माथाडी मेळाव्यात उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, माथाडी कामगारांनी काहीच कमी पडणार नाही. त्यांच्या मागे आम्ही उभे आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे, वारकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आहे. रोजगार काऱखाने याबाबत आम्ही धोरणात्मक असे निर्णय घेत आहे. दोन महिन्याचं सरकार आणि महाविकास आघाडीचं अडीच वर्षाचं सरकार यात फरक असल्याचंही शिंदेंनी सांगितलं. तसंच आज अनुभवी असे देवेंद्र फडणवीस माझ्यासोबत आहेत, त्यामुळे काहीही कमी पडणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काही घोषणा केल्या. यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांचे नाव जाहीर केले. मुख्यमंत्री म्हणाले की,"आम्ही मराठा समाजाला न्याया देवू, सारथीला मदत करू. तुमच्या पाठिशी सरकार आहे. दीड हजार लोकांच्या सरकारी नोकऱ्यांचा निर्णय घेतला आहे. अडीच वर्षात फाईल हालत नव्हती. आमचं सरकार देणारं आहे, घेणारं नाही."

समृद्धी महारामार्गासारखा ऐतिहासिक मार्ग गेम चेंजर प्रकल्प आहे. मेट्रोची कामेही वेगाने होत आहेत. आमचा कोणताही वैयक्तिक अजेंडा नाही. सर्वांना न्याय देण्याचं काम आमचं सरकार करेल. माथाडी संघटनांचेही प्रश्न आम्ही सोडवू. कामगार चळवळीत असणाऱ्या चुकीच्या प्रवृत्तींचा बंदोबस्त करू असंही मुख्यमंत्री म्हणाले.

नवी मुंबईत भूमीपुत्रांच्या गरजेपोटी घरांना संरक्षण दिलं आहे. कायदे बदलावे लागले तर बदलू पण सर्वसामान्यांना न्याय देवू. सरकार कधीच जबाबदारीपासून पळ काढणार नाही. वरळीत १० हजार लोकं बाधित होणार होते. आम्ही लोकांमध्ये जाऊन निर्णय घेतला. त्यांना भाडं देण्याचं ठरवलं. हे चालता बोलता काम करणारं सरकार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या