मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde: डोंबिवलीत मुख्यमंत्री शिंदे पोहोचले बोटीने, रात्री साडेअकराला दहीहंडीचा कार्यक्रम

Eknath Shinde: डोंबिवलीत मुख्यमंत्री शिंदे पोहोचले बोटीने, रात्री साडेअकराला दहीहंडीचा कार्यक्रम

Aug 20, 2022, 08:07 AM IST

    • Eknath Shinde In dombivali: संस्कृती जोपासण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून दीड महिन्यात तब्बल सातशे निर्णय घेतले आहेत. दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झालाय. आता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा होणार असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde In dombivali: संस्कृती जोपासण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून दीड महिन्यात तब्बल सातशे निर्णय घेतले आहेत. दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झालाय. आता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा होणार असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

    • Eknath Shinde In dombivali: संस्कृती जोपासण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून दीड महिन्यात तब्बल सातशे निर्णय घेतले आहेत. दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झालाय. आता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा होणार असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

Eknath Shinde In dombivali: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त काल सगळीकडे दहीहंडीचा उत्साह बघायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा डोंबिवलीतील दहीहंडी महोत्सवात हजेरी लावली. यासाठी ते बोटीने मानकोली वेलेगाव ते डोंबिवली असा प्रवास करून रात्री साडे अकरा वाजता पोहोचले होते. दीपेश म्हात्रे फाउंडेशनतर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरुवातीलाच साउंड सिस्टिमचा आवाज कमी कऱण्यास सांगितले. त्यांनी म्हटलं की, "आवाज फक्त गोविंदांना, इथल्या लोकांना ऐकू येईल इतकाच ठेवा. आपल्याला नियम पाळायचे आहेत. गोविंदांचे मनापासून स्वागत करतो."

ट्रेंडिंग न्यूज

Fact Chack:मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंच्या रोड शोमध्ये पाकिस्तान झेंडा ? व्हायरल व्हिडिचे सत्य उघड

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

दोन वर्षांनी साजऱ्या होत असलेल्या दहीहंडी उत्सवाचा गोविंदांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसला. आताचं सरकार हे सर्वसामान्यांच आहे. सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेणारं आहे. संस्कृती जोपासण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून दीड महिन्यात तब्बल सातशे निर्णय घेतले आहेत. दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झालाय. आता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा होणार असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

मी एकटा मुख्यमंत्री नाही तर तुम्ही सगळेजण मुख्यमंत्री आहात. मी तुमच्यातलाच एकनाथ शिंदे इथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे. तुम्ही खूप हंड्या फोडल्या पण आम्ही दीड महिन्यापूर्वी ५० जणांची हंडी फोडली. मुंबई, सुरत, गुवाहाटी पण होतं असं म्हणत विरोधकांना टोला लगावला. गेल्या अडीच वर्षात झालं नाही ते आम्ही दीड महिन्यात करण्याचा प्रयत्न केला असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच डोंबिवलीत आलोय. मी पुन्हा डोंबिवलीत येईन, कल्याण-डोंबिवलीचे प्रश्न आहेत ते नक्की आम्ही सोडवू. चांगलं काम करायची संधी सरकारला मिळालीय. राज्याचा सर्वांगिण विकास, सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचं काम आमचं सरकार करेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या