मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chitra Wagh : चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची थेट महात्मा फुलेंशी तुलना; नवा वाद उफाळणार?

Chitra Wagh : चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची थेट महात्मा फुलेंशी तुलना; नवा वाद उफाळणार?

Jan 29, 2023, 08:59 PM IST

  • Chandrakant patil comparison with mahatma phule : चित्रा वाघ यांनी पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा फुलेंशी केली. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटलांची थेट महात्मा फुलेंशी तुलना

Chandrakantpatilcomparison withmahatmaphule : चित्रा वाघ यांनी पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा फुलेंशी केली. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

  • Chandrakant patil comparison with mahatma phule : चित्रा वाघ यांनी पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा फुलेंशी केली. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मॉडल व अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या कपड्यावरून तिला इशारा दिल्यानंतर चर्चेत आल्यानंतर  भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात चित्रा वाघ यांनी अजब विधान करत भाजप नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील  यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना त्यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी केली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० ग्रॅम दागिने लंपास

पुणे भाजपच्या वतीने सन्मान स्त्री शक्तीचा हा मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू व तिळगुळ  वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, तुम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध अद्याप सुरू आहे. असं म्हणत चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा फुले यांच्याशी केली आहे. 

या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. यावेळी भाजप महिला पदाधिकारी व स्थानिक महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

चित्रा वाघ यांनी महिलांशी संवाद सांधताना चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा फुले यांच्याशी केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, महाराष्ट्रात जितक्या चळवळी झाल्या जितकी आंदोलने झाली, त्याचे केंद्र पुणे राहिले आहे. आजच्या कार्यक्रमात नवीन सुरुवातही येथून झाली आहे. आम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध जारी आहे. चित्रा वाघ यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

उर्फी जावेद बद्दल प्रश्न विचारला असता.  चित्रा वाघ म्हणाल्या की, माझा विरोध हा कोणत्या महिला किंवा तिच्या धर्माला नव्हता आणि नाहीच. तो तिच्या विकृतीला आहे. तसेच तुम्ही तिचं कधी तरी कौतुक केलं पाहिजे. कारण सध्या ती महिला पूर्ण कपड्यामध्ये दिसत आहे. कोणी तरी सुधारत असून आपण त्याच कौतुक देखील केलं पाहिजे. आता तिने काही तरी ठरवल असेल, ती सध्या चांगल्या कपड्यामध्ये दिसत आहे. त्याचे अनेक फोटो मला अनेक जण शेअर करीत आहेत. त्यामुळे आपलं तेवढंच म्हणण आहे की चांगल कपडे घाल आणि फिर अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

पुढील बातम्या