मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  चंद्रकांत पाटलांना धक्का, विखेंना ‘लॉटरी’; मुख्यमंत्र्यांकडे १० हून अधिक तर फडणवीसांकडे ७ मंत्रालये

चंद्रकांत पाटलांना धक्का, विखेंना ‘लॉटरी’; मुख्यमंत्र्यांकडे १० हून अधिक तर फडणवीसांकडे ७ मंत्रालये

Aug 14, 2022, 06:21 PM IST

    • राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १० हून अधिक खात्यांचा कार्यभार असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभागासह  ७  मंत्रालयांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांकडे १० हून अधिक तर फडणवीसांकडे ७ मंत्रालये

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १० हून अधिकखात्यांचा कार्यभार असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेगृह विभागासह ७ मंत्रालयांचाकार्यभार सोपवण्यात आला आहे.

    • राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १० हून अधिक खात्यांचा कार्यभार असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभागासह  ७  मंत्रालयांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारचे बहुचर्चित मंत्रिमंडळाचं खातवाटप अखेर जाहीर झालं आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीआज जाहीर केले आहे. यानुसार मुख्यमंत्र्यांकडे १९ हून अधिक खात्यांचा पदभार राहणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे अर्थ, गृह व जलसंपदासह एकूण सात खात्यांचा पदभार असणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने धक्कातंत्राचा वापर करत चंद्रकांत पाटलांना (Chandrakant patil ) हवे असलेले खाते दिलेले नाही.त्यांना उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य यावर समाधान मानावे लागणार आहे. मात्र दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांना मात्र महत्त्वाचं महसूल मंत्रिपद मिळालं आहे. या विभागासाठी चंद्रकांत पाटील आग्रही होते. चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यपदी असल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याचे म्हटले जात होते, मात्र भाजप कार्यकारिणीने निर्णय घेत त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करत मंत्रिमंडळात घेतले मात्र मनासारखं खातं न देऊन पुन्हा धक्का दिला. त्यामुळे नेहमीप्रमाणे येथेही भाजपचं धक्कातंत्र पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना भाजपने मुख्यमंत्री देऊन महत्वाच्या खात्यांवर दावा करून तहात शिंदेंना हरवल्याची चर्चा होती. मात्र या खातेवाटपात मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरचष्मा राहिल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे यांच्याकडे १० हून अधिक खात्यांचा कार्यभार असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभागासह ७ मंत्रालयांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांचा पदभार –

  1. सामान्य प्रशासन
  2. नगर विकास
  3. माहिती व तंत्रज्ञान,
  4. माहिती व जनसंपर्क
  5. सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प)
  6. परिवहन
  7. पणन
  8. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
  9. मदत व पुनर्वसन
  10. आपत्ती व्यवस्थापन
  11. मृदा व जलसंधारण
  12. पर्यावरण व वातावरणीय बदल
  13. अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेल्या विभागांची जबाबदारी असणार आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पदभार असणाऱ्या खात्यांची नावे –

  1. गृह
  2. वित्त व नियोजन
  3. विधी व न्याय
  4. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
  5. गृहनिर्माण
  6. ऊर्जा
  7. राजशिष्टाचार

इतर १८ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित - आदिवासी विकास

गिरीष महाजन - ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे - बंदरे व खनिकर्म

संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे - कामगार

संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत - उद्योग

प्रा.तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार - कृषी

दीपक केसरकर - शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा - पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

पुढील बातम्या