मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, फडणवीसांकडे ३ ‘जम्बो’ मंत्रालये, पाहा यादी

Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, फडणवीसांकडे ३ ‘जम्बो’ मंत्रालये, पाहा यादी

Aug 14, 2022, 05:26 PM IST

    • राज्य सरकारकडून खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांमध्ये खाती वाटण्यात आली आहेत.
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

राज्य सरकारकडून खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांमध्ये खाती वाटण्यात आली आहेत.

    • राज्य सरकारकडून खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांमध्ये खाती वाटण्यात आली आहेत.

मुंबई - राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन  तब्बल ४०  दिवसांनंतर  मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. विस्तारानंतर आठवडा उलटल्यानंतरही खातेवाटप जाहीर न झाल्याने पावसाळी अधिवेशनात कोणता मंत्री कोणत्या खात्याची उत्तरे देणार, अशी विचारणा विरोधकांकडून करण्यात येत होती. अखेर आज बहुचर्चित मंत्रिमंडळासाठी खातेवाटप जाहीर झालं आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ व गृह व जलसंपदा ही दोन जम्बो मंत्रालये सोपविण्यात आली आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

या मंत्रिमंडळात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर मोठी जबाबादारी सोपवण्यात आली आहे. त्यांना महसूल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

मंत्रिमंडळ विस्तारानुसार मुख्यमंत्र्यांकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

 

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. 

इतर १८ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित -  आदिवासी विकास

गिरीष महाजन - ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 

गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता 

दादा भुसे -  बंदरे व खनिकर्म 

संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे -  कामगार

संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत - उद्योग

 प्रा. तानाजी सावंत -  सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

रवींद्र  चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार - कृषी

दीपक केसरकर - शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा -  पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

पुढील बातम्या