मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivaji Maharaj Statue : पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर शिवरायांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण

Shivaji Maharaj Statue : पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर शिवरायांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण

Dec 04, 2023, 06:06 PM IST

  • Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sindhudurg : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

shivaji maharaj statue inauguration

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sindhudurg : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

  • Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sindhudurg : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गाच्या मालवणात पहिल्यांदा नौसेना दिन मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. सिंधुदुर्ग किल्ल्या समोरचं राजकोट परिसरात भव्य शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यातआला असून आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. भारतीय नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

आज सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. पुतळा उद्घाटनानंतर मालवणात युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिके करण्यात आली. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्ष, स्थानिक खासदार, आमदार उपस्थित आहेत. ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.

यंदाचा नौसेना दिन सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये साजरा करण्यात येत आहे. या पार्शवभूमीवर सागरी सुरक्षा वाढवण्यात आली असून सागरी पोलीस समुद्रात गस्त घालत आहेत.

भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताचा इतिहास शौर्याचा आणि सामर्थ्याचा आहे. देशाच्या सुरक्षेसाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचं असतं ते शिवाजी महाराजांनी जाणलं. समुद्री शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काम केलं. समुद्रावर ज्याचं वर्चस्व तो सर्वशक्तीमान हे शिवाजी महाराजांनी ओळखलं. शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर, कान्होजी आंग्रे यांच्यासारखी लोक उभी केली.सिंधुदुर्ग हा ऐतिहासिक किल्ला शिवाजी महाराजांच्या समुद्र शक्तीचे प्रतिक आहे.  

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या