मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandrashekhar Bawankule : भाजप म्हणतो १५२ जागा जिंकणार, अजित पवार म्हणतात ९० लढणार, मग शिंदे गटाचं काय?

Chandrashekhar Bawankule : भाजप म्हणतो १५२ जागा जिंकणार, अजित पवार म्हणतात ९० लढणार, मग शिंदे गटाचं काय?

Jul 13, 2023, 07:07 PM IST

  • Seat Sharing difference between Mahayuti : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळं महायुतीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Ajit pawar - Devendra Fadnavis - Eknath Shinde (HT_PRINT)

Seat Sharing difference between Mahayuti : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळं महायुतीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • Seat Sharing difference between Mahayuti : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळं महायुतीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Chandrashekhar Bawankule on Vidhan Sabha election Seats : ‘मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून घमासान सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केलेल्या एका विधानामुळं महायुतीत संभ्रम निर्माण झाला आहे. 'विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजप १५२ जागा जिंकेल, असा दावा बावनकुळे यांनी आज केला. त्यामुळं शिंदे गटातील अस्वस्थता आणखी वाढण्याची चिन्हं आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट सहभागी झाला आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर कार्यकर्त्यांसमोर बोलताना विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी ९० जागा लढणार असल्याचं अजित पवार म्हणाले होते. तर, शिंदे गटाला ८० ते ८५ जागांची अपेक्षा आहे. मात्र, आज बावनकुळे यांनी सांगितलेल्या आकड्यानंतर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

भिवंडी इथं भाजपनं कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी पुढील सर्व निवडणुकांत विजयाचा विश्वास बोलून दाखवला. 'भाजप महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष आहे आणि यापुढंही राहील. आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप अव्वल कामगीरी करेल. विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपला मिळणाऱ्या जागांपैकी ८० टक्के म्हणजेच, १५२ जागांवर भाजपा विजयी होईल, असंही ते म्हणाले.

राज्यात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. बावनकुळे यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपनं १५२ जागांवर लढला आणि अजित पवार यांच्या गटाला ९० जागा मिळाल्या. तर, शिंदे गटाला केवळ ४६ जागा उरतात. बावनकुळे यांनी सांगितलेला १५२ हा आकडा जिंकणाऱ्या जागांचा आहे. याचाच अर्थ भाजप त्यापेक्षा जास्त लढण्याच्या तयारीत आहे. तसं झाल्यास शिंदे गटाच्या वाट्याला काय येणार हा प्रश्न आहे.

शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आले आहेत. त्याशिवाय काही विधान परिषदेचे सदस्यही आहेत. मात्र, बावनकुळे आणि अजितदादांनी सांगितलेल्या आकड्यांचं गणित केल्यास शिंदे गटाला विद्यमान सदस्य संख्येइतक्याही जागा मिळणं कठीण आहे. त्यामुळं आता बावनकुळे यांच्या विधानावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागणार आहे.

पुढील बातम्या