मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल

Oct 01, 2022, 07:59 AM IST

    • Chhagan Bhujbal: भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सरस्वती पूजनाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता भुजबळांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं अडचणी वाढण्याची शक्यता आहेत.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (फोटो - पीटीआय)

Chhagan Bhujbal: भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सरस्वती पूजनाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता भुजबळांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं अडचणी वाढण्याची शक्यता आहेत.

    • Chhagan Bhujbal: भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सरस्वती पूजनाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता भुजबळांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं अडचणी वाढण्याची शक्यता आहेत.

Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात चेंबूर इथे एका व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्याने गुन्हा दाखल केला आहे. छगन भुजबळ यांच्यासह आणखी दोघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून धमकी दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सरस्वती पूजनाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्याच संदर्भातील व्हिडीओ पाठवल्यानंतर धमक्या देणारे कॉल आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nashik news : ३ वर्षाची चिमुकली विहिरीत पडली, वाचवण्यासाठी आईनेही मारली उडी, मायलेकींचा बुडून मृत्यू

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, ‘त्या’ अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द, आता..

Nagpur Crime : पतीशी भांडणानंतर महिलेने ३ वर्षाच्या चिमुकलीची केली हत्या, मृतदेहासोबत भटकत राहिली

Wardha News : लाईट गेल्याने उष्णता वाढून पोल्ट्री फार्ममधील १५०० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यावसायिकाचे मोठे नुकसान

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ललितकुमार टेकचंदानी असं तक्रार देणाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी भादवि कलम ५०६ (२) आणि कलम ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. टेकचंदानी यांनी जबाबात म्हटलं की छगन भुजबळ यांना दोन व्हिडीओ पाठवले होते. त्यामध्ये भुजबळ यांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे भाषण केले होते. व्हिडीओ पाठवल्यानंतर लगेच टेकचंदानी यांना धमक्या देणारे कॉल्स आणि मेसेज यायला लागले. त्यात शिवीगाळही केल्याचा आरोप टेकचंदानी यांनी केला आहे.

टेकचंदानी यांनी म्हटलं की, मला आलेल्या मेसेजमध्ये तु भुजबळ साहेबांना मेसेज पाठवतो, तुझ्या घरी येऊन गोळ्या टाकतो. दुबईची लोकं लावतो. साहेबांना मेसेज करणं महागात पडेल असं म्हटलं आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून टेकचंदानी यांना हे मेसेज आणि कॉल कुणी केले याचा तपास केला जात आहे. तंत टेकचंदानी यांनी त्यांना ज्या क्रमांकावरून मेसेज आणि कॉल आले त्याची माहिती पोलिसांना दिली आहे. दरम्यान, खासदार राहुल शेवाळे यांनीही एक ट्विट केलं असून चेंबूरचे व्यापारी ललित टेकचंदानी यांनी दिलेल्या धमकीमागे कोण आहे असा प्रश्न विचारला. तसंच धमकीला माजी मंत्र्यांचे समर्थन आहे का? धमकी कुणाच्या इशाऱ्याने दिली? अशी विचारणा केली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या