मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 1 October Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
CM Eknath Shinde

Marathi News 1 October Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Oct 01, 2022, 06:13 PMIST

Marathi News Live Updates: फाइव्ह जी तंत्रज्ञानाच्या शुभारंभाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पनवेल महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक आठमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Oct 01, 2022, 06:08 PMIST

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशव्यापी फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा शुभारंभ झाला. यामध्ये व्हर्च्युअल क्लासरूमसाठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक आठमधील विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पनवेलच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री स्वत: विद्यार्थी बनले. खुर्चीऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी 'फाईव्ह जी'चे महत्त्व सांगितले. क्रांतिकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकींग यासह सर्वच क्षेत्रात फाईव्ह जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

Oct 01, 2022, 03:48 PMIST

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी भरलेला केएन त्रिपाठी यांचा उमेदवारी अर्ज बाद

काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले झारखंडचे माजी मंत्री केएन त्रिपाठी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. स्वाक्षरीमध्ये गडबड झाल्यामुळं त्यांचा अर्ज बाद करण्यात आल्याचं काँग्रेसच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितलं. त्यामुळं आता मल्लिकार्जुन खर्गे व शशी थरूर हे दोनच अध्यक्षपदाचे दावेदार उरले आहेत.

Oct 01, 2022, 01:09 PMIST

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे साईबाबांच्या चरणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिर्डीच्या साईमंदिरात जाऊन साईबाबांची विधिवत पूजा केली. शर्मिला ठाकरे याही त्यावेळी त्यांच्या सोबत होत्या. शिर्डी संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी ठाकरे दाम्पत्याचा सत्कार केला.

Oct 01, 2022, 11:34 AMIST

मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा दिला राजीनामा

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. खर्गे यांच्यानंतर पी चिदंबरम, दिग्विजय सिंह किंवा केसी वेणुगोपाल राव हे राज्यसभेत विरोधी पक्षनेते होऊ शकतात.

Oct 01, 2022, 10:50 AMIST

India Mobile Congress: पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत इंडिया मोबाइल काँग्रेसचं उद्घाटन, ५ जी सेवेचाही शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावर सहाव्या इंडिया मोबाइल काँग्रेसचं उद्घाटन केलं आणि 5G सेवेचा शुभारंभ केला.

Oct 01, 2022, 08:31 AMIST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देशात ५जी सेवेला होणार सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील काही मोजक्या शहरांमध्ये ५जी सेवा सुरू करणार आहेत. पुढच्या काही वर्षात ही सेवा देशभर पसरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. २०३० पर्यंत भारतात ५जी कनेक्शनचं प्रमाण हे एक तृतियांशपेक्षा जास्त असेल असं सांगण्यात येत आहे.

Oct 01, 2022, 08:24 AMIST

Kangana Ranaut : कंगना रणौत आज घेणार मुख्यमंत्री शिंदेंची भेट

Kangana Ranaut Meet CM Eknath Shinde : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यामुळं राजकीय चर्चांना उधान आलं आहे. ठाकरे सरकारच्या काळात कंगनाच्या मुंबईवरील वक्तव्यामुळं मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यानंतर बीएमसीनं कंगनाच्या घराचं आणि कार्यालयांचं बेकायदा बांधकाम पाडलं होतं. त्यानंतर आता कंगना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार असल्यानं यावरून शिंदे गट आणि शिवसेनेत वाद पेटण्याची शक्यता आहे.

Oct 01, 2022, 08:23 AMIST

Womens Asia Cup : महिलांच्या आशिया कप स्पर्धेची आजपासून सुरुवात, भारतीय महिला संघ विजयासाठी सज्ज

Womens Asia Cup 2022 : आजपासून महिलांच्या आशिया कप स्पर्धेची सुरुवात होणार आहे. आज बांगलादेश आणि थायलंडमध्ये सामना होणार असून उद्या भारतीय संघ श्रीलंकेच्या संघाशी भिडणार आहे. इंग्लंडला व्हाईटवॉश दिल्यानंतर हरमनप्रीतच्या नेत्तृत्वाखालील संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळं या कपचा भारतीय संघ मोठा दावेदार असल्याचं मानलं जात आहे.

Oct 01, 2022, 07:44 AMIST

मुंबईत दुचाकीवरून दोघांनी केला गोळीबार; एकाचा मृत्यू, तीन जखमी

मुंबईत कांदिवली पोलिस स्टेशनच्या परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. दुचाकीवरून दोघांनी गोळीबार केल्यानंतर एकाचा अपघातात मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले असल्याची माहिती डीसीपी विशाल ठाकूर यांनी दिली.

    शेअर करा