मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Milk Price Hike : मुंबईकरांना दूध दरवाढीचा फटका; म्हशीच्या सुट्या दुधात तब्बल एवढ्या रुपयांनी होणार वाढ

Milk Price Hike : मुंबईकरांना दूध दरवाढीचा फटका; म्हशीच्या सुट्या दुधात तब्बल एवढ्या रुपयांनी होणार वाढ

Feb 25, 2023, 10:39 AM IST

    • Milk Price Hike in Mumbai : अमूल आणि गोकुळ यांनी दूधदर वाढ केल्यानंतर आता पुन्हा मुंबईकरांना दूधदरवाढीचा फटका बसणार आहे. मार्च महिन्यांपासून सुट्ट्या दुधाच्या दरात वाढ होणार आहे.
Milk Price Hike in Mumbai : (HT)

Milk Price Hike in Mumbai : अमूल आणि गोकुळ यांनी दूधदर वाढ केल्यानंतर आता पुन्हा मुंबईकरांना दूधदरवाढीचा फटका बसणार आहे. मार्च महिन्यांपासून सुट्ट्या दुधाच्या दरात वाढ होणार आहे.

    • Milk Price Hike in Mumbai : अमूल आणि गोकुळ यांनी दूधदर वाढ केल्यानंतर आता पुन्हा मुंबईकरांना दूधदरवाढीचा फटका बसणार आहे. मार्च महिन्यांपासून सुट्ट्या दुधाच्या दरात वाढ होणार आहे.

मुंबई : मुंबईकरांच्या खिशाला चाप बसणार आहे. गोकुळ आणि अमूलच्या दूध दरवाढीनंतर म्हशीच्या सुट्या दुधाच्या दरात वाढ होणार आहे. तब्बल ५ रुपयांनी ही वाढ होणार असून म्हशीच्या एक लिटर दूध आता ८५ रुपयांना मिळणार असल्याची माहिती एमएमपीएने दिली आहे. ही दरवाढ १ मार्चपासून लागू होणार असून ती ३१ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic change : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मेट्रो कामामुळे 'या' प्रमुख मार्गावरील वाहतुकीत आजपासून मोठा बदल

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

पिशीवीबंद दुधाची दरवाढ झाल्यानंतर ही सर्वात मोठी दूध दरवाढ राहणार आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे. या पूर्वी म्हशीच्या दुधाचे दर हे गेल्या वर्षी दुधाच्या विक्री दरात यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यावेळी देखील म्हशीच्या दुधाच्या दरात ५ रुपयांची वाढ करून ८० रुपये करण्यात आले होते. आता पुन्हा ही दूध दरवाढ झाली असल्याने आता म्हशीचे दूध हे ८५ रुपये लीटर दराने मिळणार आहे.

या दारवाढीच्या निर्णय एमएमपीएच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. चारा, भुस्सा आणि इतर वस्तूंच्या किमतीमध्ये १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळं नाईलाजानं दुधाच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचं ते म्हणाले. मुंबईत दररोज म्हशीच्या ५० लाख लीटर दुधाची विक्री होते.   यापूर्वी अमूलने २ रुपयांची दर वाढ केली आहे. तर गोकुळने देखील १ रुपयांची दर वाढ ही लागू केली होती. त्यानंतर म्हशीच्या दुधात झालेली ही मोठी दरवाढ आहे. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या