मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : शिंदेंनी सांगितलं अन् कोश्यारींनी ऐकलं; १२ आमदारांबाबत सरकारचा मोठा खुलासा

Eknath Shinde : शिंदेंनी सांगितलं अन् कोश्यारींनी ऐकलं; १२ आमदारांबाबत सरकारचा मोठा खुलासा

Aug 22, 2023, 03:17 PM IST

    • Shinde-Fadnavis Govt : विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या प्रकरणावरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
maharashtra 12 mlas governor appointed (HT)

Shinde-Fadnavis Govt : विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या प्रकरणावरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

    • Shinde-Fadnavis Govt : विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या प्रकरणावरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

maharashtra 12 mlas governor appointed : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकारने पाठवलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्याकडून सूचना करण्यात आल्यानंतर तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ आमदारांची यादी परत पाठवल्याचा दावा राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केलेली सूचना किंवा सल्ला हे न्यायिक पडताळणीच्या क्षेत्रात येत नसल्याचं शिंदे-फडणवीस सरकारने कोर्टात सांगितलं आहे. त्यामुळं आता यावरून विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

मविआ सरकार सत्तेत असताना ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी यादी तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवण्यात आली होती. परंतु त्यावर कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात पोहचलं होतं. कोश्यारी यांनी नव्या आमदारांच्या नावाला मंजुरीच दिली नव्हती. परंतु महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर कोश्यारी यांनी मविआने दिलेली यादी सरकारकडे परत पाठवली होती. आमदारांच्या नियुक्तीसाठी होत असलेल्या विलंबाबद्दल हायकोर्टाने तात्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना फटकारलं होतं. राज्यपालांची वर्तवणूक म्हणजे राज्यघटनेतील मूळ तत्त्वांशीच खेळ झालेला नाही का?, असा सवाल हायकोर्टाने केला होता. घटनात्मक कर्तव्यांशी प्रतारणा करत राज्यपाल कोश्यारी यांनी मूलभूत तत्वांना तिलांजली दिल्याची खरमरीत टिप्पणी हायकोर्टाने केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मविआने पाठवलेल्या १२ आमदारांच्या नावांची यादी सरकारला परत पाठवली होती. त्यानंतर अद्यापही राज्य सरकारकडून नव्या आमदारांची नावं राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पाठवण्यात आलेली नाही. त्यामुळं विधानपरिषदेतील १२ आमदारांची संख्या गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्याचं चित्र आहे. त्यामुळं आता येत्या काही दिवसांत राज्य सरकारकडून राज्यपालांना नव्या आमदारांची यादी पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

पुढील बातम्या