मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Aziz Qureshi : मुस्लिमांनी बांगड्या भरलेल्या नाहीत, एक-दोन कोटी मेले तरी फरक पडत नाही, माजी राज्यपालांचं वादग्रस्त विधान

Aziz Qureshi : मुस्लिमांनी बांगड्या भरलेल्या नाहीत, एक-दोन कोटी मेले तरी फरक पडत नाही, माजी राज्यपालांचं वादग्रस्त विधान

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 22, 2023 06:00 PM IST

Aziz Qureshi on Muslims : माजी राज्यपाल अजीज कुरेशी यांनी काँग्रेसवर टीका करताना मुस्लिमांना चिथावणी देणारं वक्तव्य केलं आहे.

Aziz Qureshi
Aziz Qureshi

Aziz Qureshi Controversial Statement : ‘देशातल्या २२ कोटी मुस्लिमांनी बांगड्या भरलेल्या नाहीत. एक-दोन कोटी मेले तरी हरकत नाही. आम्ही एका मर्यादेपर्यंत सहन करू शकतो. पाणी गळ्यापर्यंत आले तर शांत बसणार नाही…’

ट्रेंडिंग न्यूज

हे वक्तव्य आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरेशी यांचं. मध्य प्रदेशातील विदिशा इथं एका कार्यक्रमात त्यांनी काँग्रेस पक्षाच्या बदलत्या ध्येयधोरणांवर टीका केली. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्यांची माळच लावून दिली.

Vijaykumar Gavit : ऐश्वर्या रायवरील विधान गावितांना भोवले, महिला आयोगानं धाडली नोटीस; तीन दिवसांत मागितलं उत्तर

'काँग्रेसही आता हिंदुत्वाचा अजेंडा चालवत आहे. काँग्रेसचे काही लोक हिंदुत्व, यात्रा, जय गंगा मैया, जय नर्मदा मैय्या यावर बोलतात. हे लाजिरवाणं आहे. मी जे बोलतोय त्याबद्दल मला पक्षातून काढून टाकलं तरी फिकीर नाही. नेहरूंचे वारसदार, काँग्रेसचे लोक आज धार्मिक यात्रा काढतात. जयजयकार करतात. गर्व से कहो हिंदू है… असं म्हणतात. काँग्रेस कार्यालयात देवदेवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात, ही बुडून मरण्यासारखी गोष्ट आहे, असं कुरेशी म्हणाले. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या नर्मदा पूजेवरही त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली.

मुस्लिमांनी काँग्रेसला मत का म्हणून द्यावं?

'मुसलमान हे कोणत्याही पक्षाचे गुलाम नाहीत. मुस्लिमांनी काँग्रेसला मत का द्यावं, काँग्रेसनं कधी त्यांना नोकऱ्या दिल्या नाहीत, पोलीस, लष्कर, नौदलात सहभागी करून घेतलं नाही. मग मुस्लिमांनी त्यांना मतदान का करावं?, असा सवाल त्यांनी केला.

Navneet Rana Death Threat : ‘गर्दीत ये तुला कायमचं संपवतो’, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

तलवारीनं उत्तर द्यावं लागेल!

देशात २२ कोटी मुस्लिम आहेत. त्यातले एक-दोन कोटी आमच्या समाजासाठी, धर्माचं ऋण फेडण्यासाठी शहीद झाले तर काही फरक पडत नाही, असं म्हणत कुरेशी यांनी मुस्लिमांना वेळ पडल्यास तलवारी काढण्याचं आवाहन केलं. 'मशिदी जाळा, घरं जाळा, दुकानं जाळा, मुलांना अनाथ करा, आमच्या बहिणींच्या बांगड्या फोडा. हा सगळा अन्याय-अत्याचार एक मर्यादेपर्यंत सहन केला जाऊ शकतो. पण मर्यादा ओलांडली गेल्यास तलवार बाहेर काढावी लागेल. तलवारीनंच सामना करू. आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

WhatsApp channel