मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bachchu Kadu: न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Bachchu Kadu: न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Mar 08, 2023, 05:12 PM IST

  • Bachchu Kadu News:नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आमदार बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Bachchu Kadu

Bachchu Kadu News:नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आमदार बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • Bachchu Kadu News:नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आमदार बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Bachchu Kadu: नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शासकीय कामात अडथळा आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हात उगरणे आमदार बच्चू कडूंना अंगलट आले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

"दिव्यांग बांधवांनी २०१७ मध्ये नाशिक आयुक्त कार्यालयात दोन आंदोलनं केली होती. दिव्यांग कल्याण निधी तीन-तीन वर्ष खर्च केला जात नसल्याचा आम्हाला फोन आला. त्यानंतर मी आयुक्तांना दोन पत्र लिहिली. या पत्राला आयुक्तांनी उत्तर दिले नाही. सामन्य माणसाचा अधिकार खड्यात घालत आयुक्तांनी कायद्याची ‘ऐशी की तैशी’ केली”, असे बच्चू कडू म्हणाले.

पुढे बच्चू कडू म्हणाले की, "पत्र दिल्यानंतरही उत्तर न मिळाल्याने आम्ही आंदोलन करण्यासाठी गेलो. मौज मजा करायला गेलो नव्हतो. ज्यांना हात-पाय, डोळे नाहीत, अशा दिव्यांग बांधवांच्या हक्काचा निधी हे अधिकारी खर्च करत नाहीत, म्हणून आम्हाला आंदोलन करावे लागले. मात्र, आंदोलन केले म्हणून आम्हालाच शिक्षा सुनावली. याउलट आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ का आली? याची चौकशी करायला हवी. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले."

नाशिक आयुक्तांवर हात उगारल्या प्रकरणी बच्चू कडू यांना दोन वेगवेगळ्या प्रकारणात ही दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, २०१७ मध्ये अंपगाच्या मागण्यांसाठी नाशिक महापालिकेत आंदोलन सुरु केले. त्यावेळी बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी २०१४ मध्ये बच्चू कडू यांना अचलपूरचे आमदार म्हणून निवडून आल्याच्या तक्रारीत दोषी ठरवले होते. याप्रकरणात बच्चू कडू यांनना दोन महिन्यांचा साधा कारावास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार न्यायालयाने हा निकाल दिला होता.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या