मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कोल्हापूरातील दोन्ही खासदार शिंदेंच्या संपर्कात;जिल्ह्यात शिवसेना भूईसपाट होणार?

कोल्हापूरातील दोन्ही खासदार शिंदेंच्या संपर्कात;जिल्ह्यात शिवसेना भूईसपाट होणार?

Jul 17, 2022, 10:19 AM IST

    • Kolhapur Politics : कोल्हापूरातील कुस्तींच्या आखाड्यांची देशभरात चर्चा होत असते. परंतु आता शिवसेनेत झालेल्या बंडामुळं जिल्ह्यात सुरू झालेल्या राजकीय आखाड्याचीही चर्चा सुरू आहे.
Shivsena MPs Politics In Kolhapur (HT)

Kolhapur Politics : कोल्हापूरातील कुस्तींच्या आखाड्यांची देशभरात चर्चा होत असते. परंतु आता शिवसेनेत झालेल्या बंडामुळं जिल्ह्यात सुरू झालेल्या राजकीय आखाड्याचीही चर्चा सुरू आहे.

    • Kolhapur Politics : कोल्हापूरातील कुस्तींच्या आखाड्यांची देशभरात चर्चा होत असते. परंतु आता शिवसेनेत झालेल्या बंडामुळं जिल्ह्यात सुरू झालेल्या राजकीय आखाड्याचीही चर्चा सुरू आहे.

Shivsena MPs Politics In Kolhapur : कोल्हापूराची देशभरात कुस्ती कॅपिटल अशी ओळख आहे. परंतु जेव्हापासून शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे तेव्हापासून जिल्ह्यातील दोन खासदांचा पाठिंबा कुणाला असणार, याविषयी शंका व्यक्त करण्यात येत होत्या. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कोल्हापूरात येऊन शिंदेगटावर जोरदार फटकेबाजी केली होती. परंतु आता याच फटकेबाजीचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. कारण आता जिल्ह्यातील हातकणंलेचे खासदार धैर्यशिल माने आणि कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयावर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

Manoj jarange patil : अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

कोल्हापूरातील मेळाव्यात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पक्षाचे माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली होती. क्षीरसागर यांनी नाना पटोलेंना प्रेमानं जेवायला बोलावलं, पण त्याचं बील मात्र सतेज पाटलांकडून घेतल्याचा दावा विनायक राऊतांनी केला होता. ही टीका क्षीरसागरांना जिव्हारी लागली आणि शिवसेनेचे दोन्ही खासदार हे शिंदेगटाला पाठिंबा देतील, अशी घोषणाच त्यांनी केली. क्षीरसागर यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या काही तासानंतरच आता कोल्हापूरातील दोन्ही खासदार शिंदेगटाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

विशेष म्हणजे विनायक राऊतांनी कोल्हापूरात घेतलेल्या मेळाव्याला खासदार मंडलिक आणि खासदार माने हे उपस्थित नव्हते, मंडलिक हे दिल्लीत असल्यानं आणि माने हे आजारी असल्यानं मेळाव्यात येऊ शकले नाहीत, असं बोललं जात आहे. परंतु क्षीरसागर यांनी विनायक राऊतांच्या टीकेनंतर दोन्ही खासदार शिंदेगटात येतील, असा इशारा दिला होता. परंतु या दोन्ही खासदारांनी आतापर्यंत त्यांची भूमिका जाहिर केलेली नाही.

अनेक शिवसेनेचे नेत शिंदे गटात करतायंत प्रवेश...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर आता त्यांना राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. ४० आमदारांसह काही शिवसेनेच्या खासदारांनीही शिंदेंना पाठिंबा दिला आहे. याशिवाय कोंकण, मुंबई, ठाणे आणि मराठवाड्यासह अनेक ठिकाणी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महापालिकांमधील शिवसेनेच्या लोकांनी शिंदेगटाला साथ देण्याचा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या