मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 17 July 2022 Live: युपीए कडून मारगारेट अल्वा उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार
मारगारेट अल्वा

Marathi News 17 July 2022 Live: युपीए कडून मारगारेट अल्वा उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार

Jul 17, 2022, 04:52 PMIST

Daily News Update

Jul 17, 2022, 04:52 PMIST

युपीए कडून मारगारेट अल्वा उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार

उपराष्ट्रपती पदासाच्या उमेदवारी देण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते शदर पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी १७ पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. युपीए कडून मारगारेट अल्वा यांना उपराष्ट्रपदी पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर एनडीएकडून जगदिप धनकड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली.

Jul 17, 2022, 03:49 PMIST

दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील सर्व विरोधी पक्षांची बैठक सुरु आहे. दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, सीपीआयएम नेते सिताराम येच्युरी, शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि इतर नेते उपस्थित आहेत.

Jul 17, 2022, 02:42 PMIST

Sanjay Raut: 'दिया तो कब्र पर भी जल रहा है, वेट अँड वॉच'

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांचा फोटो शेअर केला आहे. राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेले असतानाचा हा फोटो आहे. हा फोटो शेअर करत राऊतांनी म्हटलं की, उनकी मुस्कुराहट पर न जाना, दिया तो कब्र पर भी जल रहा है. वेट अँड वॉच असं म्हणत राऊतांनी इशारा दिला आहे.

Jul 17, 2022, 01:17 PMIST

Covid 19 Vaccination : देशात कोरोना लसीचा २०० कोटी डोसचा टप्पा पूर्ण

देशात कोरोना प्रतिबंधक लसीचे २०० डोस आज पूर्ण झाले. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसह कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन केले.

<p>पंतप्रधान मोदींचे ट्विट</p>
पंतप्रधान मोदींचे ट्विट

Jul 17, 2022, 11:53 AMIST

Corona Update : देशात सलग तिसऱ्या दिवशी २० हजारांहून जास्त रुग्ण

भारतात सलग तिसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या २० हजारांहून जास्त आढळली आहे. गेल्या २४ तासात २० हजार ५२८ नवे रुग्ण आढळून आले असून सक्रीय रुग्णांची संक्या १ लाख ४३ हजार ४४९ इतकी झाली आहे. दिवसभरात ४९ जणांचा कोरोनामुले मृत्यू झाला आहे.

Jul 17, 2022, 09:30 AMIST

Indigo Flight: इंडिगोच्या विमानाचं कराचीत इमर्जन्सी लँडिंग

पाकिस्तानच्या कराचीमध्ये इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. शारजाहमधून हैदराबादला विमान जात असताना तांत्रिक अडचणींमुळे विमानाचे लँडिंग केले गेले.

Jul 17, 2022, 08:16 AMIST

Delhi Rain: दिल्लीत २ आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी

दिल्लीत जवळपास १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी जोरदार पाऊस झाला. अनेक भागात पावसाने हजेरी लावल्यानं तापमानात काही प्रमाणात घट झाली. आजही हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Jul 17, 2022, 07:42 AMIST

Earthquake in Manipur: मणिपूरला भूकंपाचा धक्का

मणिपूरला भूकंपाचा धक्का, रात्री उशिरा १२ च्या सुमारास ४.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे धक्के बसले.

    शेअर करा