मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahapalika Elections : अखेर ठरलं, या महिन्यात होणार महापालिकांच्या निवडणुका; पाहा वेळापत्रक

Mahapalika Elections : अखेर ठरलं, या महिन्यात होणार महापालिकांच्या निवडणुका; पाहा वेळापत्रक

Jul 07, 2023, 12:27 PM IST

    • Mahapalika Elections 2023 : गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील बहुतांश महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहे. त्यामुळं पालिकांमध्ये प्रशासकराज सुरू आहे.
Maharashtra Mahapalika Elections 2023 (HT)

Mahapalika Elections 2023 : गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील बहुतांश महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहे. त्यामुळं पालिकांमध्ये प्रशासकराज सुरू आहे.

    • Mahapalika Elections 2023 : गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील बहुतांश महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहे. त्यामुळं पालिकांमध्ये प्रशासकराज सुरू आहे.

Maharashtra Mahapalika Elections 2023 : गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात राजकीय हालचालींना वेग आलेला असतानाच पालिका निवडणुकीचं परिपत्रक निवडणूक आयोगाने काढलं आहे. त्यात येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यातील अनेक महापालिकांमध्ये दोन ते तीन वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाही, त्यात मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या महापालिकांचा समावेश आहे. येत्या तीन महिन्यांत महापालिका निवडणुका पार पडणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

महाराष्ट्र राज्य आयोगाने एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यात विधानसभेच्या मतदार याद्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. एक जूलै २०२३ रोजी आस्तित्वात असलेल्या मतदार याद्या सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत महापालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता राज्यातील चारही प्रमुख पक्षांनी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

पालिकांमधील प्रशासकराज संपणार...

मुंबई, पुणे, नागूपर, पिंपरी चिंचवड, ठाणे, मीरा-भाईंदर आणि छत्रपती संभाजीनगर अशा राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रशासकराज सुरू आहे. कोरोना महामारी आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळं महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेकदा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. परंतु आता राज्यातील महापालिकांमध्ये थेट निवडणुका होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांचा कस लागणार आहे.

पुढील बातम्या