मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; 'या' भागातील पाणी कपात मागे

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; 'या' भागातील पाणी कपात मागे

Mar 05, 2024, 11:49 PM IST

  • Mumbai Water Cut News : मुंबई शहरांसह उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली १५ टक्के पाणी कपात महापालिकेने मागे घेतली असून बुधवारपासून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे.

मुंबईतील पाणी कपात मागे

Mumbai Water Cut News : मुंबई शहरांसह उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली १५ टक्के पाणी कपात महापालिकेने मागे घेतली असून बुधवारपासून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे.

  • Mumbai Water Cut News : मुंबई शहरांसह उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली १५ टक्के पाणी कपात महापालिकेने मागे घेतली असून बुधवारपासून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे.

Mumbai water Supply : मुंबईकरांसाठी उन्हाळ्याच्या चाहुल लागताच महापालिकेने आनंदाची बातमी दिली असून संपूर्ण मुंबईतील पाणी कपात बुधवारपासून (६ मार्च) मागे घेण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत १५ टक्के पाणी कपात सुरू होती, जी आता मागे घेण्यात आली आहे. पिसे जल उदंचन केंद्रातील तीन ट्रान्सफार्मर व त्या आधारे २० पंप संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आल्याने पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची  माहिती बीएमसीने दिली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai, Pune weather update : मुंबईत उष्णतेच्या लाटेने तर उन आणि पावसाने पुणेकर झाले हैराण!

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा आकडा वाढला

Maharashtra Weather Update: अवकाळी पाऊस काही थांबेना! रायगड, रत्नागिरी, नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

गूड न्यूज! यंदा वेळेआधीच मान्सूनचे आगमन, ‘या’ दिवशी केरळात होणार दाखल, महाराष्ट्रात कधी येणार?

याबरोबरच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील १५ टक्के कपात देखील मागे घेण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील १५ टक्के पाणी कपात बुधवार दिनांक ६ मार्च २०२४ पासून मागे घेण्यात येणार असल्याने या भागात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

मुं मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जलउदंचन केंद्रात ट्रान्सफार्मरला दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी आग लागली होती. या आगीमुळे पाणीपुरवठा यंत्रणा बाधित झाली होती. यामुळे त्यामुळे मुंबई महानगरात १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. त्यानंतर दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करून टप्प्याटप्प्याने ट्रान्सफॉर्मर आणि त्यावर आधारीत पंप सुरू करण्यात आले.  आता ही यंत्रणा पूर्ववत झाली आहे. सद्यस्थितीत तीन ट्रान्सफार्मर सुरु होवून त्या आधारे सर्व २० पंप सुरू करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत पिसे केंद्रातील सर्व म्हणजे २० पैकी २० पंप कार्यरत झाले आहेत. त्याआधारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या