मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marine Drive Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मरीन ड्राईव्हबाबत पालिकेचा मोठा निर्णय

Marine Drive Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मरीन ड्राईव्हबाबत पालिकेचा मोठा निर्णय

Sep 16, 2023, 11:22 AM IST

  • marine drive beautification news : मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

marine drive beautification news (HT)

marine drive beautification news : मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

  • marine drive beautification news : मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

marine drive beautification news : भारतासह जगभरात प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील मरीन ड्राईव्ह बाबत मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेत पर्यटकांना दिलासा दिला आहे. मरीन ड्राइव्ह, फ्लोरा फाऊंटन आणि एशियाटिक लायब्ररी परिसराचा विकास तसेच सुशोभिकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. हेरिटेज विकास करण्यासाठी पालिकेने व्यवस्थापन सल्लागार संस्था आणि प्रकल्प सल्लागारांच्या नेमणुकीसाठी प्रस्ताव मागवले आहे. त्यामुळं आता मुंबईतील प्रसिद्ध मरीन ड्राईव्हचा येत्या काही दिवसांत नव्याने विकास केला जाणार आहे. देशी तसेच विदेशी पर्यटकांची संख्या वाढवणं हा यामागचा हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मरीन ड्राईव्ह परिसराचा काही महिन्यांपूर्वी दौरा केला होता. त्यावेळी नागरी सुविधा, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि सुशोभिकरणाच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्राच्या दिशेकडील इमारतींना विशिष्ट प्रकारची रंगरंगोटी करावी. प्रसाधनगृहे, स्वच्छतेची काळजी घेत आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो सुरू करण्याच्या सूचना बीएमसीला केल्या होत्या. परंतु आता मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतर मरीन ड्राईव्ह परिसराचं सुशोभिकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेकडून घेण्यात आला आहे.

महापालिकेकडून मरीन ड्राईव्ह परिसरात सी साईड प्लाझा या नव्या पर्यटनस्थळाचं निर्माण करण्यात येणार आहे. ५३ मीटर लांब आणि ५ मीटर रुंद अशा जागेत व्ह्युविंग डेकची निर्मिती केली जाणार आहे. नागरिकांना समुद्र पाहण्यासाठी आणि चालण्यासाठी जेट्टीच्या ठिकाणी तयार करण्यात येणार असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता मरीन ड्राईव्हचा विकास झाल्यास मुंबईत येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढील बातम्या