मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aurangabad : शिंदे गटाच्या मंत्र्याविरोधात भाजपचं डफली बजाओ आंदोलन; सिल्लोडमध्ये नेमकं काय घडतंय?

Aurangabad : शिंदे गटाच्या मंत्र्याविरोधात भाजपचं डफली बजाओ आंदोलन; सिल्लोडमध्ये नेमकं काय घडतंय?

Feb 06, 2023, 05:35 PM IST

    • BJP Protest Against Shinde Group : महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या भाजपनं आता थेट शिंदे गटाच्या मंत्र्याविरोधात जोरदार आंदोलन केल्याची घटना समोर आली आहे.
BJP Protest Against Shinde Group (HT)

BJP Protest Against Shinde Group : महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या भाजपनं आता थेट शिंदे गटाच्या मंत्र्याविरोधात जोरदार आंदोलन केल्याची घटना समोर आली आहे.

    • BJP Protest Against Shinde Group : महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या भाजपनं आता थेट शिंदे गटाच्या मंत्र्याविरोधात जोरदार आंदोलन केल्याची घटना समोर आली आहे.

BJP Protest Against Shinde Group Leader Abdul Sattar In Sillod Aurangabad : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून ४० आमदारासंह बंड करत भाजपच्या पाठिंब्यानं सत्ता स्थापन केली आहे. सत्तांतर झाल्यापासून भाजप आणि शिंदे गटात कुरबुरी होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. परंतु आता भाजपनं थेट शिंदे गटाच्या मंत्र्याविरोधात आंदोलन केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं आता भाजप-शिंदे गटात काहीही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड नगरपरिषदेनं करवाढ केल्याच्या मुद्द्यावरून भाजपनं थेट डफली बजाव आंदोलन केलं आहे. त्यामुळं आता सत्तांतर झाल्यानंतर भाजपनं शिंदे गटाविरोधात पहिल्यांदाच आंदोलन केल्यामुळं त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

नेमकं प्रकरण काय आहे?

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची गेल्या तीन दशकांपासून सिल्लोड नगरपरिषदेत एकहाती सत्ता आहे. नगरपरिषदेनं शहरात मालमत्ता करवाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळं भाजप कार्यकर्त्यांनी सिल्लोड नगरपरिषदेसमोर शिंदे गट आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात डफली बचाव आंदोलन सुरू केलं. यावेळी नियमबाह्य पद्धतीनं करवाढ करण्यात आल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गट आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या मंत्र्याविरोधात आंदोलन केल्यामुळं भाजप आणि शिंदे गटात संधर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर सिल्लोडचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शिंदेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांना कृषिमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. परंतु राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं आणि कृषिप्रदर्शनासाठी अधिकाऱ्यांना पैशांची मागणी केल्याच्या प्रकरणावरून सत्तार यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता सिल्लोडमध्येच भाजपनं त्यांच्याविरोधात आंदोलन केल्यामुळं सत्तार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

पुढील बातम्या