मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी वृत्तवाहिनीच्या संपादकावर अखेर गुन्हा

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी वृत्तवाहिनीच्या संपादकावर अखेर गुन्हा

Sep 06, 2023, 06:25 AM IST

    • Kirit Somaiya Viral Video : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले होते. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. दरम्यान, या प्रकरणी अखेर वृत्तवाहिनीच्या संपादकावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kirit Somaiya (HT)

Kirit Somaiya Viral Video : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले होते. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. दरम्यान, या प्रकरणी अखेर वृत्तवाहिनीच्या संपादकावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    • Kirit Somaiya Viral Video : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले होते. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. दरम्यान, या प्रकरणी अखेर वृत्तवाहिनीच्या संपादकावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या एक अश्लील व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता. लोकशाही या वृत्तवाहिनीने या प्रकरणी वृत्त दिले होते. यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, या वृत्तवाहिनीच्या संपादकावर मुंबई पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

ट्रेंडिंग न्यूज

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Ganeshotsav 2023 : सरकारकडून गणेशोत्सवाआधी नवे दर जाहीर, खासगी वाहतूकदारांच्या लुटीला बसणार चाप

लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संपादकांची नवे आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमा अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chandrayaan 3: 3D मध्ये बघा चंद्र कसा दिसतो ? इस्रोकडून नवे फोटो ट्वीट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्यावर सायबर पोलिस उपायुक्त यांच्या देखरेखीखाली पूर्व सायबर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमय्या यांनी या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी तक्रार केली होती. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू सुरू होती. या प्रकरणाचा तपास हा मुंबई गुन्हे शाखेद्वारे केला जात होता. मंगळवारी किरीट सोमय्या यांचा जबाब नोंदवण्यात आल्यावर रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकशाही या वृत्तवाहिनीने १७ जुलै रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडिओ बाबत वृत्त दिल्याने खळबळ उडाली होती. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भर मुद्दा सभागृहात मांडत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. किरीट सोमय्या यांनी धमकावून किंवा भीती दाखवून काही मराठी भगिनींचे शोषण केल्याचेही आरोप करण्यात आले होते. अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओ क्लिप्स असलेला पेनड्राईव्ह सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या