
गणेशोत्सवासाठी महामंडळाकडून ज्यादा बसेसची घोषणा केल्यानंतर आता गणेशोत्सवाआधी नवे दर जाहीर केले आहेत. यामुळे दरम्यान खासगी वाहतूकदारांच्या मनमानीला चाप बसणार आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या प्रवाशांच्या लुटीला लगाम बसणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने हे नवे दरपत्रक जाहीर केले आहे. खासगी बस वाहतूकदाराला परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा केवळ दीडपट अधिक आकारणी करू शकतात.
या दराच्या अधिक दराने भाडे वसूल केल्यास प्रवाशांना तक्रार करण्यासाठी नंबर उपलब्ध करून दिला आहे. अधिक दर आकारल्यास प्रवाशांनी ०२३५२-२२५४४४ या व्हॉटस् ॲप नंबरवर तिकीटाचा फोटो, वाहन क्रमांक याच्यासह तक्रार करावी. असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने शेअर रिक्षा थांबे आणि दरपत्रक देखील ठरवून दिलेले आहेत, त्यानुसारच प्रवाशांनी भाडे द्यावे, असं आवाहनही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या
